तुमची वीज कायमची तोडली? तत्काळ भरा बिल, वीज माफ!

0
2

द पॉईंट नाऊ: कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांना थकीत रकमेत सवलत देऊन त्यांना पुन्हा वीज जोडणी देता यावी, यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने ‘विलासराव देशमुख अभय ‘योजना’ आणली आहे. या योजनेचा लाभ घेऊन अनेकांनी जोडणी पुनर्स्थापित केली आहे. या योजनेचा कालावधी ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे.

थकीत वीजबिलावर दंड आणि व्याज आकारला जात असल्याने घरगुती प्रमाणचे अनेक वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांचादेखील वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ आली आहे अशा ग्राहकांना पुन्हा विद्युत जोडणी मिळावी, यासाठी महावितरणकडून अभय योजना जाहीर करण्यात आलेली आहे. या योजनेमुळे बंद पडलेले कृषी, औद्योगिक व घरगुती वीज जोडण्या पुन्हा सुरू होतील. त्यामुळे रोजगार निर्माण होऊन राज्याचे अर्थचक्र सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

गेल्या मार्च महिन्यात सुरू झालेल्या या योजनेचा कालावधी केवळ ऑगस्ट २०२२ या कालावधीपर्यंतच होता. त्यानंतरही अनेक थकीत ग्राहकांना योजनेला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केल्याने या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यात हजारो ग्राहकांनी योजनेचा लाभ घेत विद्युत पुरवठा पुनर्स्थापित

काय आहे विलासराव देशमुख अभय योजना

कायमस्वरुपी वीजपुरवठा बंद झालेल्या ग्राहकांना थकीत रकमेत सवलत आणि त्यांना पुन्हा वीज जोडणी देता यावी म्हणून विलासराव देशमुख अभय योजना राबविली जाते या योजनेमुळे खंडित विजेची पुन्हा जोडणी मिळण्याची संधी प्राप्त झाली आहे.

रक्कम कशी भरणार ?

■ थकीत मुद्दल एकरकमी भरणाऱ्यांना व्याज व विलंब आकार शंभर टक्के माफ केला जातो. याशिवाय त्यांना सुलभ हप्त्याचीदेखील सोय आहे.

■ सुलभ हप्त्यासाठी मुद्यलच्या ३० टक्के रक्कम एकरकमी भरावी लागेल. उर्वरित रक्कम त्यांना ६ सुलभ हप्त्यात भरावी लागेल.

३१ डिसेंबरपर्यंत मुदत

■ थकीत वीजबिलामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला असेल, अशा ग्राहकांना यापूर्वी १ ऑग स्टपर्यंत अभय योजना लागू होती.

■ आता ही योजना ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी दिवाळी प्रकाशमान होणार आहे.

पात्र कोण आहे ?

■ विलासराव देशमुख अभय योजना राज्यातील सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी आहे.

■ कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहक योजनेचा लाभ घेऊ शकतात.

व्याज व विलंब आकार माफ

■ थकबाकीदार ग्राहकांना थकबाकीची रक्कम एकरकमी भरावी लागेल. तरच या ग्राहकांना थकबाकीवर असलेले व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येते.

■ ग्राहकांनी एकरकमी रक्कम भरल्यास त्यांना अतिरिक्त सवलतदेखील दिली जाते. व्याज, विलंब आकार माफ केल्याने त्यांना फक्त मूळ थकबाकीची रक्कमच एक रकमी भरावी लागते.

….तर तुम्ही अपात्र

■ या योजनेतील हप्तेवारीचा लाभ घेणारा ग्राहक हप्ता भरण्यास अपयशी ठरल्यास असे ग्राहक या योजनेतून अपात्र ठरतील, त्यांना योजनेतील पुढील कोणतेही लाभ दिले जाणार नाहीत.

■ योजनेच्या मुदतीसाठी निर्धारित केलेल्या तारखेत त्यांचे अर्ज मंजूर असणे अपेक्षित आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here