किराणाचा अर्धा खर्च फटाक्यांवर; ४० टक्के महाग, तरी बार उडणारच!

0
2

द पॉईंट नाऊ: वाढती महागाई, गतवर्षी लांबलेल्या पावसामुळे फटाक्यांचे उत्पन्न सुरू होण्यास झालेला विलंब, फटाक्यांसाठी लागणाऱ्या कागदाची टंचाई, ॲल्युमिनियम पावडर व इतर रसायनांच्या किमतीत झालेली वाढ व वाहतूक खर्च महागल्याने गत वर्षीच्या तुलनेत यंदा फटाके ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे दिवाळीतील किराणा मालासाठी लागणाऱ्या खर्चाच्या तुलनेत अर्धा खर्च फटाक्यांवर होत आहे.

दिवाळीचा सण म्हटला की विद्युत रोषणाई, रुचकर फराळाचा आस्वाद आणि फटाक्यांची आतषबाजी आलीच. घरोघरी फराळाची तयारी सुरू असून बाजारात गर्दी ओसांडून वाहत आहे. फटाके विक्रीसाठी महापालिकेने ठरवून दिलेल्या जागेवर टॉल्स सजले असून मोठी उलाढाल सुरू आहे. दिवाळीतील दरवर्षी या व्यवसायातून कोट्यवधीची उलाढाल होते. गेली दोन वर्षे कोरोना महामारी मुळे दिवाळीसह सर्वच सणांवर काही निर्बंध होते, त्यामुळे फटाक्यांसह सर्वच बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला. यंदा सर्व निर्बंध हटल्याने बाजारात उत्साह असून फटाक्यांना मागणी मिळत आहे. किराणा मालाच्या पन्नास टक्के खर्च फटाक्यांवर होत आहे.

फॅन्सी फटाक्यांना पसंती

कानठळ्या बसणारे सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब खरेदीसाठी अनेकजण नाक मुरडत असून त्याऐवजी भुईचक्र, रॉकेट, पाऊस, नागगोळ्या, सुरसुऱ्या अशा फॅन्सी फटाक्यांना पसंती देत आहे. मोठ्या आवाजापेक्षा लक्षवेधी रोषणाई करणाऱ्या या फटाक्यांना बच्चे कंपनीकडूनदेखील मागणी होत आहे.

शिवकाशीवरून येतात फटाके

■ देशात फटाक्यांचे ९५ टक्के उत्पादन तामि ळनाडूतील शिवकाशी तर उर्वरित ५ टक्के उत्पन्न ग्वाल्हेर, सायपूर आदी ठिकाणी होते.

■ शिवकाशी परिसरात गतवर्षी जानेवारीपर्यंत पाऊस सुरू होता. नंतर आलेल्या पोंगल सणामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली, त्या परिणामी उत्पादन उशिरा सुरू झाले.

३५ ते ४० टक्के दरवाढ

■ कच्च्या मालाची टंचाई, उराशी सुरु झालेल्या उत्पन्न, वाहतूक खर्चातील वाढ आदी कारणांमुळे फटाक्यांचे दर वाढले आहे. गत वर्षीच्या तुलनेत हे दर तब्बल ३५ ते ४० टक्क्यांनी जास्त आहे.

■ परिणामी दिवाळीतील किराणा माल खरेदीवर जितका खर्च होतो, त्यांच्या पन्नास टक्के खर्च फटाक्यांवर होत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here