Lok Sabha Election | शांतिगिरी महाराज ‘मविआ’चे उमेदवार..?

0
4
Lok Sabha Election
Lok Sabha Election

Lok Sabha Election | नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये अनेक दिवसांपासून चढाओढ सुरू होती. दरम्यान, काल या वादाला काहीसा ब्रेक लागला. काल कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यामुळे महायुतीचा उमेदवार जाहीर झाला आहे. काही दिवसांपूर्वी शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तसेच भाजपकडूनही वारंवार या मतदार संघावर दावा केला जात होता. त्यामुळे हेमंत गोडसेंचे तिकीट धोक्यात असल्याची चर्चा होती. मात्र काल स्वतः श्रीकांत शिंदे यांनीच या चर्चांना विराम लावला. (Lok Sabha Election)

दरम्यान, यातच आता नाशिकच्या राजकारणातून आणखी एक मोठी बातमी समोर आली असून, स्वामी शांतीगिरी महाराज हे नाशिक लोकसभेतून महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे बोलले जात आहे.  शिवसेना ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत शांतीगिरी महाराजांच्या भक्त परिवाराची चर्चा झाल्याबाबतचे वृत्त एबीपी माझाने प्रसिद्ध केले होते. शांतीगिरी महाराज हे महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, काल महायुतीचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे ते आता महाविकास आघाडीचा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. (Lok Sabha Election)

Shrikant Shinde | श्रीकांत शिंदेंनी केली हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा

Lok Sabha Election | महायुतीचेच तिकीट हवे होते. पण… 

नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यावर शांतिगिरी महाराज हे ठाम असून, त्यांना महायुतीचेच तिकीट हवे होते. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र, विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा नाशिक लोकसभेतून हॅटट्रिक करायची होती. त्यामुळे तेदेखील तिकिटासाठी आग्रही होते. अखेर काल हा तिढा सुटला आणि महायुतीचे नाशिक लोकसभेचे उमेदवार म्हणून एमयांत गिदसे यांच्या नावाची घोषणा झाली.(Lok Sabha Election)

त्यामुळे आता शांतिगिरी महाराजांकडून महाविकास आघाडीच्या पर्यायासाठी हालचाली सुरू आहेत. महाविकास आघाडीत हा मतदार संघ ठाकरे गटाच्या वाट्याला आला असून, येथून विजय करंजकर यांच्या उमेदवारीची चर्चा होती. यासाठी प्रचार देखील सुरू करण्यात आला होता. मात्र, आता शांतिगिरी महाराजांमुळे विजय करंजकर यांची उमेदवारी धोक्यात आल्याची चर्चा होती. (Lok Sabha Election)

Shantigiri Maharaj | शांतिगिरी महाराजांच्या एन्ट्रीने नाशिकचे राजकीय वातावरण तापले

‘मविआ’कडून शांतिगिरी महाराजांना मिळण्याची शक्यता..?

स्वामी शांतिगिरी महाराजांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते. तर, महायुतीकडून ही निवडणूक लढवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे शांतिगिरी महाराजांनी एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली. एवढेच नाहीतर त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी दिली जाईल अशी त्यांच्या भक्तांचीही अपेक्षा होती.(Lok Sabha Election)

मात्र, काल श्रीकांत शिंदे यांनी गोडसे यांची उमेदवारी जाहीर केल्याने, शांतिगिरी महाराज आणि त्यांच्या भक्तांचा हिरमोड झाला. त्यामुळे त्यांनी आता महाविकास आघाडीकहा पर्याय स्वीकारला असून, महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळेल का? हे पाहावं लागणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here