Skip to content

Shantigiri Maharaj | शांतिगिरी महाराजांच्या एन्ट्रीने नाशिकचे राजकीय वातावरण तापले

Shantigiri Maharaj

Shantigiri Maharaj |  आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून नाशिकचे राजकीय महत्त्व वाढले असून, अनेक उमेदवार नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच शांतीगिरी महाराजांनीही आपण नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. तर, दुसरीकडे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेदेखील तिसऱ्यांदा हॅटट्रिक करण्यासाठी इच्छुक आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वीच शांतीगिरी महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे नाशिक लोकसभेचे तिकीट ही गोडसेंना डावलून त्यांना दिले जाणार असे सांगितले जात होते. (Shantigiri Maharaj)

यामुळे नाशिकचे राजकीय वातावरण आधीच तापलेले आहे. कालच हेमंत गोडसे यांनी शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीबाबत याबाबत प्रतिक्रिया दिली असून, ते म्हणाले होते की,”शांतिगिरी महाराजांमुळे तिकीट कापले जाणार नसल्याचा विश्वास यावळी हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला. दरम्यान, यातच आता बाबाजी भक्त परिवाराने सोशल मीडियावर हेमंत गोडसेंचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शांतिगिरी महाराजांनी हेमंत गोडसे यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता आणि त्यावेळी हेमंत गोडसे यांनी महाराजांचे आभार मानले आणि जय बाबाजी भक्त परिवार हा लाखोंच्या संख्येने असल्याने याचा आपल्याला निवडणुक काळात निश्चितच फायदा होणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता हेमंत गोडसे यांनीही शांतिगिरी महाराजांना पाठिंबा देण्याची मागणी जय बाबाजी भक्त परिवाराकडून सोशल मीडियावर केली जात आहे. (Shantigiri Maharaj)

Shantigiri Maharaj | शांतीगिरी महाराज नाशिकमधून लढवणार लोकसभा निवडणुक..?

Shantigiri Maharaj | हेमंत गोडसे म्हणाले…

शांतिगिरी महाराज आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यानंतर त्यांच्यामुळे हेमंत गोडसे यांची उमेदवारी धोक्यात असल्याबाबत प्रश्न केला असता, “शांतिगिरी महाराजांमुळे तिकीट कापले जाणार नसल्याचा विश्वास असून, इच्छुक उमेदवार हे प्रत्येक ठिकाणी भेटी घेतात. पुढील निर्णय नीट विचार करून पक्षश्रेष्ठी घेतील. मागील 10 वर्षांपासून नाशिक लोकसभेचे नेतृत्व मीच करतो. या काळात मी संघटना बांधणी, विकासकामे केली आहे. मागे आम्ही शिवसेनेच्या सर्व 18 खासदारांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली होती आणि या 18 जागा परत मिळवण्याचा आग्रह असून, या 18 जागा मिळतील असा विश्वास अस्लयचेही यावेळी ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आपला विश्वास आहे. नविन 5 उमेदवारदेखील शिवसेनेत येतील, रवींद्र वायकर आले आणि अजून काही धक्के मिळणार असल्याचेही हेमंत गोडसे म्हणाले. (Shantigiri Maharaj)

Lok Sabha 2024 | विद्यमान खासदार आणि इच्छुक उमेदवारात केंद्रीय मंत्र्यांसमोर ‘तु तु मै मै’

यामुळे महायुती देऊ शकते शांतिगिरी महाराजांना उमेदवारी?

  • भाजप आणि शिंदे गटाला अपेक्षित असलेला हिंदूत्ववादी चेहरा.
  • नाशिकमध्ये होणार असलेल्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराजांचा विचार केला जाऊ शकतो.
  • शांतिगिरी महाराजांचा भक्तपरिवार हा मोठ्या प्रमाणातील असून ग्रामीण भागात अधिक मतदार आहे.
  • गेल्या वर्षापासूनच शांतीगिरी महाराजांनी नाशिकसह अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत प्रचाराची सुरुवात केली होती. (Shantigiri Maharaj)

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!