Vasant More | तात्यांनी राज ठाकरेंची साथ सोडली;.., अन् माफी मागत ढसाढसा रडले

0
4
Vasant More
Vasant More

Vasant More |  नुकताच नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. हा वर्धापन दिन होऊन कवळ 3 दिवस झाले की, पुण्यातून मनसेला एक वाईट बातमी आली आहे. मनसेचे धडाडीचे नेते वसंत मोरे यांनी मनसेला आणि राज ठाकरेंना अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ ठोकला आहे. एक पत्र लिहीत त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या मागोमाग पुण्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी धडाधड राजीनामे दिले आहेत. दरम्यान, आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली असता, या पत्रकार परिषदेत त्यांना अश्रु अनावर झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे वसंत मोरे हे काहीसे नाराज असल्याचे सांगितले जात होते.

आपल्याला डावलले जात होते

दरम्यान, आपली भूमिका स्पष्ट करताना वसंत मोरे म्हणाले की,”आपल्याला पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांना आणि कार्यक्रमांना बोलावले जात नव्हते. जाणूनबुजून डावलले जात होते. ही खंत आपण अनेकदा बोलूनही दाखवली होती, असे ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपूर्वी ते शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. तेव्हापासूनच त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आज अखेर त्यांनी निर्णय घेतला असून, आज त्यांनी सोशल मीडियावरुन मनसेला रामराम ठोकला आहे. वसंत मोरे ही पुण्यातील मनसेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे मनसेला मोठे खिंडार पडले आहे. दरम्यान, मोरे यांनी पक्ष सोडल्यानंतर मनसेचे अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्तेदेखील त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray | काळारामाचं दर्शन घेऊन मनसे फुंकणार लोकसभेचे रणशिंग

त्यांचा वैयक्तिक निर्णय

वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली असून, यावेळी ते भावुक झाले होते. ते म्हणाले की,”आतापर्यंत मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी फेसबुक आणि व्हॉटसअॅपच्या माध्यमातून माझ्याकडे राजीनामे दिले आहेत. मात्र मी कोणावरही पक्ष सोडण्यासाठीची सक्ती केली नाही. हा वसंत मोरेवर झालेला अन्याय आहे, असे त्यांना वाटते. तरीही मी या सर्वांना पक्ष सोडू नये असेच सांगितले असून, पक्ष सोडायचा की नाही, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे यावेळी वसंत मोरे म्हणाले.

राज ठाकरेंनी जर बैठक घेतली तर त्यांना सांगा की… 

दरम्यान, वसंत मोरे यांनी मनसेच्या पुणे शहर कार्यकारिणीतील सदस्यांवर अनेक आरोप केले असून, मनसेच्या पुण्यातील काही नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे चुकीचे अहवाल पाठवलेत. पुणे लोकसभा मतदारसंघातून मनसे निवडणुक लढवू इच्छित नाही, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. मनसेची पुण्यात ताकद नाही, असे वातावरण या पक्षाच्याच काही नेत्यांनी तयार केले आहे. ज्यावेळी राज ठाकरे पुण्यात आले होते. त्याआधीच काही नेत्यांनी शाखाध्यक्षांच्या मिटींग घेतल्या होत्या. आणि त्यांना सांगण्यात आले होते की, राज ठाकरेंनी जर तुमची बैठक घेतली तर त्यांना सांगा की शहरात जेमतेम वातावरण आहे.

MNS Vardhapan Din | नाशकात ‘राज गर्जना’; मला माझ्या खांद्यावर माझीच पोरं खेळवायची

महाराष्ट्र सैनिक हे मला लाईक करतात.

मनसैनिकांनी पुण्याची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मात्र येथील नेत्यांना नाही. त्यामुळे मनसेच्या काही नेत्यांनी मुंबईला चुकीचा अहवाल पाठवल्याचे आरोप वसंत मोरे यांनी केले आहेत. पुण्यातील महाराष्ट्र सैनिक हे मला लाईक करतात. इतर नेत्यांना ते लाईक करत नाहीत. हीच त्यांची खरी अडचण होती. मी पुण्याच्या शहराध्यक्ष पदी असताना पक्षसंघटना वाढवली आणि तीच संघटना आता संपवण्याचे काम या मनसेच्या काही स्थानिक नेत्यांकडून सुरु असल्याची खदखद यावेळी वसंत मोरे यांनी बोलून दाखवली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here