Skip to content

Bachchu Kadu | प्रत्येक मतदारसंघात बच्चू कडू ४०० उमेदवार उभे करणार

Bachchu Kadu

Bachchu Kadu | या लोकसभा निवडणुका अत्यंत रोमांचक होणार अस्लयके दिसत आहे. आधीच मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे हे आकमक असून, त्यांनी मराठा समाजाला प्रत्येक गावातून 200 ते 300 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार मराठवाड्यात अनेक उमेदवारांनी अर्ज भरले आहे. यातच आता बच्चू कडू यांनीही अशाच एका मोहिमेची घोषणा केली आहे. (Bachchu Kadu)

गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडे हे महायुतीत नाराज असल्याचे दिसत होते. ते महायुती आणि मोदी सरकारच्या विरोधात अनेक वक्तव्य करत होते. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. तर, यावेळी त्यांनी त्यांच्या नवीन अभियानाची घोषणा देखील केली. ते म्हणाले की,”प्रत्येक मतदारसंघात ‘मी खासदार’ या अभियानाच्या अंतर्गत 300 ते 400 उमेदवार आपल्याला उभे करायचे आहे. दरम्यान, आधीच मराठा समाजातर्फे अर्ज दाखल केले जात आहेत. यात आता बच्चू कडू यांनीही असा आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे निवडणूक आयोगाची चिंता वाढणार आहे.(Bachchu Kadu)

Bachchu Kadu | काय म्हणाले बच्चू कडू..?

याबाबत बोलतांना पुढे बच्चू कडू म्हणाले की, “या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही देखील तयारी केली असून, आता आम्ही प्रत्येक मतदारसंघातून 300 ते 400 उमेदवार उभे करणार आहोत. यासाठी आमच्या काही बैठकाही झाल्या असून, ‘मी खासदार’ असे अभियान आम्ही राबवणार आहोत.

याचे कारण म्हणजे आम्हाला आमचं बॅलेट पाहायला मिळत नाही. आमचं मत आम्ही कुणाला मारलंय. मत कुठे गेलंय, ते कुणाला मिळालं आहे. आणि कुणाला नाही मिळालं याचा मूलभूत अधिकारच ईव्हीएम मशीनने आमच्याकडून हिनावून घेतला आहे. आता आमचा तो अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव नाही, त्यांना घरकुल मिळत नाहीये. शहर व गाव अशी वेगळी तफावत पडत आहे. या सर्व मुद्यांसाठी ‘मी खासदार’ असं अभियान राबवणार असल्याचे यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले.(Bachchu Kadu)

Bachchu Kadu | बच्चू कडुंनी बोलून दाखवली नाराजी, म्हणाले ‘भिकार** योजना..’

भाजपला आमची गरज वाटत नसेल… 

महायुतीमध्ये छोट्या पक्षांना भाजप विचारत नाही. कदाचित त्यांना गरज वाटत नसेल. त्यामुळे आता याची आम्ही तयारी केली असून, प्रत्येक मतदारसंघातून 300 ते 400 उमेदवार उभे करायचे आहे. एकनाथ शिंदे यांनाही आता मी स्वतःहून विचारणार नाही. त्यांनी विचारलं तरच मी त्यांना सांगेल. महायुतीचा पर्याय आमच्यासमोर आहे. मात्र, सध्या इकडचं नातं तुटलं तरच आम्ही समोर जाऊ, असेही बच्चू कडू यांनी सांगितले. (Bachchu Kadu)

Shrikant Shinde | श्रीकांत शिंदेंनी केली हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!