Skip to content

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज नाशिक दौऱ्यावर


नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज नाशिक दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या शहर आणि ग्रामीण कार्यकारिणीची आढावा बैठक पार पडणार आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने हा दौरा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज दुपारी ते मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवनात आधी ग्रामीण कार्यकारिणीची आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते शहर कार्यकारिणीची आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला पक्षाचे जिल्ह्यातील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांच्या “शोध – नेहरू, गांधी पर्वाचा” या पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यात ते उपस्थित राहणार आहे. महाकवी कालिदास कलामंदिर येथे संध्याकाळी ५ वाजता हा सोहळा पार पडणार असून यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ, पत्रकार खासदार कुमार केतकर व माजी आमदार उल्हासदादा पवार आदी उपस्थित राहणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!