मोठी बातमी, यंदा शिवाजी पार्कवर कोणाचाच दसरा मेळावा नाही ! हे आहे कारण…

0
1

मुंबई : आताची सगळ्यात मोठी बातमी आहे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून. मुंबई महापालिकेने कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून शिंदे गट व ठाकरे गट ह्या दोन्ही गटांना शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी नाकारली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा वाद थेट हायकोर्टापर्यंत पोहोचला आहे. तर दुसरीकडे मुंबई मनपाने नुकतीच यासंदर्भात मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई मनपाने शिंदे गट व शिवसेना या दोघांना शिवाजी पार्कवर होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत दसरा मेळावा घेण्यासाठीची परवानगी नाकारली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, पोलिसांच्या अभिप्रायाच्या आधारे ही परवानगी नाकारण्यात आल्याचे पालिकेकडून जाहीर करण्यात आले.

दरम्यान, पालिकेने जाहीर केलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, ‘दोन्ही परस्परविरोधी अर्जदारांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळावी यासाठी अर्ज केले. मात्र, कोणत्याही एका अर्जदाराला त्यासाठी परवानगी दिल्यास त्यातून शिवाजी पार्कच्या संवेदनशील परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे आम्ही ह्या दोघा अर्जदारांचे अर्ज रद्दबातल करत आहोत’, असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटल्या, बीकेसीमध्ये त्यांना परवानगी मिळाली आहे. पण तरीही शिवाजी पार्कमध्ये घुसून ते परवानगी मागत आहेत. पोलीस किंवा पालिका प्रशासन या दबावाला बळी पडणार नाहीत. कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा त्यांच्यावर ढकलला जाईल, या दृष्टीने त्यांनी परवानगी नाकारली आहे. आता कोर्ट जो निर्णय घेईल, तो आम्ही स्वीकारू. तसेच महाराष्ट्रात रडीचा व कळीचा डाव चालू असून या डावाला जनता फसणार नाही. जनता सगळे बघत आहे, असेही यावेळी त्या म्हणाल्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here