Jayant Patil Nashik | शरद पवारांनंतर जयंत पाटील नाशकात; जयंत पाटलांचा आजचा दौरा का महत्त्वाचा..?

0
59
Jayant Patil Nashik
Jayant Patil Nashik

नाशिक : लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उत्कृष्ठ कामगिरीनंतर शरद पवारांचे या भागाकडे विशेष लक्ष असल्याचे दिसत आहे. नाशिक हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून, हा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जय्यत तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. दरम्यान, नुकतंच शरद पवार (Sharad Pawar) हे नाशिक, नगर दौऱ्यावर आले होते. यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील आज नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.

दिवंगत माजी आमदार मालोजीराव मोगल (Malojirao Mogal) यांच्या स्मृतिनिमित्त निफाड (Niphad) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी शरद पवार उपस्थित होते. यानंतर आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे आपल्या निष्ठावंतांच्या मेळाव्यासाठी नाशिक दौऱ्यावर येणार असून, यानिमित्ताने ते विधानसभेसाठी इच्छुकांच्याही भेटीगाठी व मुलाखती घेणार असल्याची माहिती आहे. (Jayant Patil Nashik)

Sharad Pawar NCP | थोरल्या पवारांनी भाजपची विकेट पाडली; माजी राज्यमंत्री शरद पवारांच्या गळाला

विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार 

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार असून ते सर्व आमदार फुट पडल्यानंतर अजित पवारांसोबत गेल्याने नाशिकमध्ये कोणीही तगडा उमेदवार शरद पवारांकडे शिल्लक नाही, असे बोलले जात असताना राष्ट्रवादीने एका साध्या शिक्षक असलेल्या भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना उमेदवारी दिली आणि केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या भारती पवारांचा दारुण पराभव करत भाजपचा गड मिळवला. दरम्यान, आता शरद पवार गटाकडून नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात असून, यासाठीच आजचा हा जयंत पाटलांचा नाशिक दौरा महत्वाचा असणार आहे.

Jayant Patil Nashik | यासाठी जयंत पाटलांचा दौरा महत्त्वाचा

सध्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राज्यभरात निष्ठावंतांच्या मेळाव्याच्या (Nishthawant Melava) माध्यमातून विधानसभेसाठी आढावा घेत आहेत. आज नाशिकमध्येही ते विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेणार असून, विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती आणि भेटीगाठीही जयंत पाटील घेणार असल्याची माहिती आहे. तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय परिस्थितीचा आढावाही ते घेणार आहेत. (Jayant Patil Nashik)

Sharad Pawar | भुजबळांच्या भेटीनंतर शरद पवार नाशिक दौऱ्यावर; ही वेगळ्या राजकारणाची ‘नांदी’..?

नाशकात अजित पवार गटाची सर्वाधिक ताकद..?  

नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे येवल्यात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), दिंडोरीत नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal), सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate), देवळालीत सरोज अहिरे (Saroj Ahire), निफाडमध्ये दिलीप बनकर (Dilip Bankar), आणि कळवणमध्ये नितीन पवार (Nitin Pawar) असे एकूण 15 पैकी सहा आमदार आहेत. तर, दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे पाच शिंदे गटाचे दोन आणि कॉंग्रेसचे एक आमदार आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here