Jalgaon | उष्णतेने घेतला मुक्या जीवांचा बळी; १०० मेंढ्यांचा मृत्यू

0
51
Jalgaon
Jalgaon

Jalgaon |  सध्या राज्यात तापमानाने उच्चांक (Temperature) गाठला आहे. तर, महाराष्ट्रात विदर्भ आणि खान्देश या उष्ण पट्ट्यातील भागात उन्हाने एकच खर केला आहे. दरम्यान, जळगावमध्ये (Jalgaon) उन्हामुळे वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना ताजी असतानाच आता, उष्णतेमुळे मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चढला असून, तापमान जवळपास 47 अंशांवर पोहोचले आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान सध्या विदर्भ आणि खान्देशात असून, जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. दरम्यान, या वाढत्या उष्णतेमुळे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा या गावात मेंढपाळ कुटुंबीयांच्या १०० पेक्षा जास्त मेंढ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळजनक उडाली असून, उन्हामुळे नागरिकही घराबाहेर पडत नसून, जिल्ह्यात उष्माघातामुळे मृत्यू झाल्याच्याही अनेक घटना उघडकीस आल्या होत्या. (Jalgaon)

Jalgaon | १ खासदार ठाकरे गटात अन् ४०० कार्यकर्ते शिंदे गटात 

Jalgaon | आमदार पाटील यांनी दिली भेट

दरम्यान, स्थानिक पशू चिकित्सकांनी या मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर उष्मघातामुळेच या मेंढ्या दगावल्याचे अहवालातून समोर आले आहे. ही घटना समोर आल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील (mla chandrakant patil) यांनी घटनास्थळी भेट दिली आणि नुकसानग्रस्त मेंढपाळ कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केले. (Jalgaon)

Jalgaon | उन्मेष पाटलांमुळे स्मिता वाघ यांचे जाहीर झालेले तिकीट कापणार..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here