सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यातील पिंपळगाव वा. येथील जनता विद्यालय व जुनियर कॉलेजचा इयत्ता बारावी कला शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. कॉलेजने 100 टक्के निकालाची उज्वल परंपरा या वर्षीही कायम ठेवली आहे. विद्यालयात गायत्री दत्तात्रय गाडे ( 86.17 %) प्रथम , चंचल रोहिदास सोनवणे (77.00 %) द्वितीय, आकाश धारासिंग जाधव (76.83 %) तृतीय,
आरती दादाजी कचवे (74.83 %) चौथा, मंदिरा संतोष डामरे (74.17 %) पाचवा याप्रमाणे यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्रचे देवळा तालुका संचालक विजय पगार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील, माध्यमिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एन. डी. पाटील, प्राचार्या एस. एम.आहेर ,पर्यवेक्षक प्रा. आर्. एच्. देसले, प्रा. एस. के. भालेराव, प्रा. एम. पी. गांगुर्डे, प्रा. ए. एस. ठाकरे, प्रा. आर. जे. सोनवणे, प्रा. एस. डी. निकम, प्रा. के. पी. रेपाळ, रवींद्र निकम, भूषण बच्छाव आदींनी अभिनंदन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम