Skip to content

लव्हेबल नाशिक लिव्हेबल सिटी आहे का?


द पॉईंट नाऊ: नाशिकचे हवा, पाणी उत्तम आहे. मुंबई, पुण्यापेक्षा गर्दी कमी आहे आणि गुन्हेगारीही तुलनेत कमी आहे, असे वाटते आहे? असेल तर मग आपल्या लाडक्या शहराला लिव्हेबल म्हणून घोषित करण्यासाठी सर्वेक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन स्मार्ट सिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाद्वारे गेल्या पाच वर्षांपासून घेतल्या जात असलेल्या इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स सर्वेक्षणाच्या तिसऱ्या पर्वास १ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. सर्व प्रमुख शहरांमध्ये शासन आणि प्रशासन, तसेच त्या- त्या शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासनाचे इतर प्रमुख विभाग पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असतात.

या सर्व सेवासुविधांचा आढावा घेऊन त्यात सुधारणा व्हावी यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ह्याच प्रक्रियेचा मुख्य भाग असणाऱ्या नागरिकांची मतं जाणून घेण्याचा टप्पा हा सिटीझन पर्सेप्शन सर्व्हेच्या माध्यमातून म्हणजेच ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ सर्वेक्षणाची सुरुवात १ नोव्हेंबरला होत आहे.

१५ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सर्वेक्षणामध्ये भाग घेण्यासाठी https://eol2022.org /citizenfeedback या वेबसाइटला भेट देऊन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. नाशिक शहरासाठी ८०२७७६ हा स्थानिक स्वराज्य संस्था कोड देण्यात आलेला आहे. लिंक ओपन केल्यावर नाव, मोबाइल नंबर आणि माहिती भरल्यानंतर यानंतर रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य, वाहतूक, बँक, सार्वजनिक वाहतूक, शहरातील कायदा व सुव्यवस्था कशी आहे, अशा साध्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. ‘इज ऑफ लिव्हिंग सर्व्हेक्षण २०२२ मधून करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणाद्वारे शहरांमध्ये असलेल्या सुविधा या पुरेशा आहेत किंवा कसे, नागरिकांचे सुविधांप्रती मत याद्वारे भविष्यातील योजना आणि कार्यपद्धती ठरविण्यास मदत होणार आहे.

टॉप टेनमध्ये येण्याची संधी

२०१८ साली नाशिक शहराला २१, तर २०२० साली ३८ क्रमांक मिळाला होता. यंदा आपले गुणांकन सुधरावयाचे असेल, तर जास्तीत जास्त नागरिकांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी या ऑनलाइन सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपले सकारात्मक मत देऊन देशातील प्रथम दहामधील सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर बनविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!