Skip to content

आपण विकत घेत असलेली मिठाई त्रासदायक तर नाही ना?


द पॉईंट नाऊ: अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने दोन वर्षांपूर्वीपासून खुल्या मिठाईवर ‘बेस्ट बिफोर’ची तारीख टाकणे बंधनकारक केले आहे. सुरुवातीला विक्रेत्यांनी त्याची अंमलबजावणी केली.शहरासह उपनगरांमधील लहान मोठी दुकाने तसेच स्वीट मार्ट विक्रेत्यांकडून ‘बेस्ट बिफोर’च्या निर्देशाशिवाय मिठाईची विक्री होत आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने ‘बेस्ट बिफोर’ बघून घेणे तसेच मिठाई त्रासदायक ठरणार नाही ना. याबाबतची शाश्वती करून मगच खरेदी करणे अत्यावश्यक आहे.

नाशिकमध्ये मिठाईची सुमारे साडेचारशे दुकाने आहेत. त्यात काउंटरमध्ये विविध प्रकारची मिठाई मांडलेली असते. मात्र, ती मिठाई कधीपासूनची आहे, त्याबाबत दुकानात किंवा बॉक्सवरही उल्लेख नसतो. कधीपासून ती ठेवलेली आहे, याची नोंद नसल्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे खुल्या मिठाईवर बनविण्याच्या तारखेसह ती कधीपर्यंत वापरावी, याचा उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मिठाई विक्रेत्यांना यापूर्वीच सूचित केले आहे.

दोन वर्षांपूर्वी काही महिने अनेक दुकानांमध्ये मिठाईवर ‘बेस्ट बिफोर’चे लेबल लावले जात होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अनेक दुकानांमधून हे बाब झालेले आहे.

शहरात मिठाईची ४५० दुकाने

● शहरात लहान-मोठी मिळून मिठाईची ४५० दुकाने आहेत. सणासुदीच्या काळात मिठाई, खवा, मावा, भेसळीनिमित्त जिल्ह्यात ३१ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे.

● अन्न आणि औषध प्रशासनामार्फत अन्नपदार्थ उत्पादक, रिपॅकर, घाऊक विक्रेते यांच्या तपासणीसाठी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या नियमित पथकासह दक्षता पथकाचीही नेमणूक करण्यात आली आहे.

१ कोटी ३१ लाखांचा माल जप्त

■ शहरातील मोठ्या व प्रसिद्ध दुकानांमध्ये या नियमांचे पालन होताना दिसते. परंतु, उपनगरांमध्ये किंवा हायवेच्या कडेला असलेली काही मिठाई दुकाने, बेकऱ्यांमध्ये या नियमांकडे डोळेझाक होते. जिल्ह्यांत अशा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांकडून १ कोटी ३१ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.

१५१ नमुने रवाना

जिल्ह्यात मिठाई आणि नमकीनचे ३२, खाद्यतेल आणि वनस्पती तूप आणि तुपाचे ३९, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे ३५ आणि सणासुदीचे विविध अन्नपदार्थ ४५ असे एकूण १५१ नमुने विश्लेषणासाठी रवाना करण्यात आले. सिडकोतील १४ मिठाई दुकानदारांकडून २६ मिठाई आणि अन्य खाद्यपदार्थांचे नमुने पाठविण्यात आले आहेत.

शिळ्या मिठाईमुळे विषबाधेची शक्यता

दिवाळीपूर्वीच्या काळात मिठाईमध्ये भेसळ होण्याचे अनेक प्रकार उघडकीस येतात. मोठ्या प्रकरणांमध्ये अन्न व औषध प्रशासनातर्फे त्याबाबत कारवाईही करण्यात येते. परंतु, काही मिठाई विक्रेत्यांकडून ‘बेस्ट बिफोर’ची तारीख न टाकताच विक्री केली जाते. अशा शिळ्या मिठाईमुळेच विषबाधेची शक्यता वाढून संबंधित विक्रेत्यांच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!