देवळा : देवळा – मालेगाव रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसामुळे तालुक्यातील सर्वच मार्गावरील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे . जागोजागी मोठ मोठे खड्डे पडली आहेत. मात्र आज तूर्तास अल्पसा का असेना मात्र प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सणासुदीच्या काळात हा दिलासा महत्वाचा आहे.

खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. याची ओरड झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देवळा – नाशिक , देवळा – मालेगाव रत्यावरील खड्डयांच्या दुरुस्ती कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या दोन्ही राज्यमार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढली असून, खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात घडत आहेत. सद्या तात्पुरत्या स्वरूपात का होईना खड्डे बुजवत असल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले असून, आगामी काळात तालुक्यातील सर्व रस्ते मजबुत करण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम