ठाकरे गटातील ४ आमदार आपल्या संपर्कात – नारायण राणेंचा मोठा दावा

0
3

पुणे : शिवसेना उद्धव ठाकरे गटातील ४ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. त्यामुळे राणेंच्या या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटात आणखी गळती होणार का ? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांच्या सोबतीने शिवसेनेतून मोठी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. शिंदे यांनी आपला वेगळा गट स्थापन केल्यानंतर शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टीवर आपला दावा सांगितला. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष अजूनही सुरु आहे. पण जेव्हा पक्षाच्या अस्तित्वाची लढाई कोर्टात आणि निवडणूक आयोगासमोर गेली. तेव्हा निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवत दोन्ही गटाला नवीन नाव आणि चिन्ह दिले गेले होते. त्यांनतर उद्धव ठाकरे आपल्यासोबत असलेल्या उर्वरित आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने पुन्हा एकदा पक्षाची बांधणी करत आहेत. अशातच पुन्हा एकदा राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेनेत फूट पडणार का ? अशी राजकीय चर्चा सुरु झाली आहे.

नारायण राणे यांनी पिंपरी-चिंचवड येथील रोजगार मेळाव्यानंतर माध्यमांसमोर बोलताना म्हणाले, ठाकरे गट आता कुठे राहिलाय ? शिवसेना संपली. ५६ आमदारावरुन सहा-सातवर आले आहेत. त्यातील काही ऑन दी वे आहेत, ते कधीही सहभागी होती. पण सध्या माझ्या संपर्कात चार आमदार आहेत, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

यावेळी रोजगार मेळाव्याबद्दल बोलताना राणे म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुण-तरुणींना नोकरी उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातील १० लाख नोकऱ्याचा पहिला टप्पा केला आहे. तसेच शासनाच्या विविध विभागात नोकऱ्या दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी चांगले काम केले आहे. आज ७५ हजार नोकऱ्या दिल्या, ज्यांना नोकऱ्या मिळाल्यात त्यांना आनंद आहे. पण यावरुन कोणी राजकारण करत असेल, तर दिवाळी असल्यामुळे काही बोलणार नाही.

तसेच, राणेंनी भास्कर जाधवांवरही हल्लाबोल चढवला. ते म्हणाले की, मीटिंग घेतली म्हणजे बालेकिल्ला झाला असे नाही. सांगून घ्यावी ना, मी पण मिमिक्री करु शकतो, पण याला टिंगल म्हणातात. आणि कोणाची टिंगल मस्करी करणे, हे चांगले गुण नाहीत. तसेच त्यांच्या हल्ल्याची मला काही माहिती नाही. पण राजकारणाचा स्तर अजिबात घसरत चालला नसून जे बोलतात त्यांचा थर खालावला आहे. त्यामुळे आपले वैचारिक स्तर घसरु नये, असे मला वाटते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here