Skip to content

मनपा शिक्षकांना सातवा वेतन आयोगाचा फरक मिळणार


द पॉईंट नाऊ: मनपा शिक्षण विभागाला १८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासह शिक्षकांच्या अडचणी सोडविण्याचे ठोस आश्वासन महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. शिक्षण विभागाला निधी उपलब्ध होणार असल्याने सातव्या वेतन आयोगाचा फरक बिलाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महानगरपालिका शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या दालनात पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने सर्व शाळांची वेळ पूर्वीप्रमाणे एकसारखी करण्यात यावी, शिक्षकांच्या वेतनात कोणतीही कपात करू नये. अनुकंपा
नियुक्त्यांबाबत २०१७ च्या शासन आदेशानुसार कार्यवाही करावी. वरिष्ठ आणि निवड श्रेणीबाबत सेवाज्येष्ठतेनुसार यादी तयार करून त्वरित कार्यवाही करावी. केंद्रप्रमुख यांना द्यावे. शिक्षण विभागात नवीन कर्मचारी देण्यात यावे. सातवा वेतन आयोग फरक लवकर अदा करावा.
५ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सराव संच देण्यात यावा. डीसीपीसी धारकांना एनपीएस मध्ये तत्काळ वर्ग करावा.

सर्वप्रकारच्या पदोन्नती ही नियमानुसार विनाविलंब द्यावी. सर्व शाळांची रंगरंगोटी व स्वच्छतागृहे साफसफाई करण्यात यावी. या मागण्यांचा समावेश होता. सर्व मागण्या सोडविण्याचे आश्वासन आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिले. या बैठकीत माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, उपायुक्त मनोज घोडे-पाटील, अतिरिक्त आयुक्त अर्चना तांबे, मुख्य लेखाधिकारी महाजन, शिक्षणाधिकारी धनगर, अधीक्षक थोरात, लिपिक बाबा वाघ, सुदाम धोंगडे, दीपक टिळे, विठ्ठल धनाइत, मोतीराम पवार, प्रकाश शेवाळे, राजीव दातीर, नितीन नानकर, ईश्वर चव्हाण, धर्मेंद्र बागुल आदी उपस्थित होते.

वाचन कट्ट्याची सूचना मनपा शिक्षण विभागाचा निधी ६० कोटींऐवजी ४२ कोटी मंजूर झाला होता. या बैठकीत आयुक्तांनी १८ कोटी तत्काळ वर्ग करण्याचे आदेश दिल्याने शिक्षकांना सातवा वेतन आयोग फरक बिलाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर सर्व शाळांमध्ये वाचन कट्टा, वाचू आनंदे असा उपक्रम तयार करावा, अशी सूचना आयुक्तांनी संघटनेला केली. तसेच शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांच्याशी संपर्क करून अनुदान वेळेत द्यावे, अशी सूचना केली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!