IND VS PAK | क्रिकेट ODI Worldcup 2023 मधील सर्वात हायवॉल्टेज सामना भारत विरूद्ध पाकिस्तान सुरू होण्यास आता काही तासच उरलेले आहेत. हे दोन्ही संघ सध्या जबरदस्त फॉर्मध्ये दिसत आहेत. पाकिस्तानने नेदरलँड आणि श्रीलंकेचा धुरळा उडवून आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. तर दुसरीकडे भारताने ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तानला धूळ चारून पाकिस्तानला इशारा दिलेला आहे. त्यामुळे भारत विरूद्ध पाकिस्तान (IND VS PAK) ही मॅच पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. याच पार्श्वभूमीवर एका पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा पाकिस्तानी चाहता भारतात येऊन “जितगा भाई जितेगा-पाकिस्तान जितेगा” अशा घोषणा देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र भारतीयांनी त्याचा चांगलाच पोपट केला.
नेमकं घडलं तरी काय?
या पाकिस्तानी चाहत्याला ‘क्रिकेट चाचा’ या नावानं ओळखलं जात आहे. प्रत्येक भारत vs पाकिस्तान मॅचमध्ये हे काका टीव्हीवर झळकताना दिसतात. सध्या ते गुजरातमध्ये १४ तारखेच्या सामन्याचं तिकिट खरेदी करत होते. यावेळी भारतीय प्रेक्षकांना पाहून त्यांनी ‘जितेगा भाई जितेगा’ अशी घोषणा दिली. मात्र ही घोषणा पूर्ण होण्याआधीच भारतीय चाहत्यांनी ‘इंडिया जितेगा’ अशा घोषणा देत काकांचा पोपट केलेला आहे. बरं त्यानंतर पुन्हा एकदा चाचांनी पाकिस्तानच्या नावाने घोषणा देण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु भारतीय प्रेक्षकांसमोर त्यांचं काहीच चाललेलं नाही. शेवटी दात-ओठ खात, डोकं खाजवत त्यांनी आपली पराभव मान्य केला.
Nashik | पाटलीनबाई म्हणता, राजकारणी माझ्या पोराचा एन्काऊंटर करणार
मुंबईतील क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर!
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्या होणार्या भारत vs पाकिस्तान सामन्यापूर्वी मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान विशेष ट्रेन धावणार असल्याची घोषणा भारतीय रेल्वेने केली आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम हे 132,000 आसन क्षमता असलेले तसेच आयसीसी विश्वचषक भारत vs पाकिस्तान क्रिकेट सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे. मुंबईहून प्रवास करणाऱ्यांना सामावून घेण्यासाठी, मुंबई सेंट्रल ते अहमदाबादपर्यंत अतिरिक्त रेल्वे सेवा उद्या धावणार आहेत. जेणेकरून क्रिकेट रसिकांना सामन्याला उपस्थित राहता येईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम