Skip to content

Chhagan Bhujbal : भुजबळांना मराठ्यांचा द्वेष का?


Chhagan Bhujbal | मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व ओबीसी मधून आरक्षण मिळावे. यासाठी अंतरवाली सराटी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची सभा १४ ऑक्टोबरला जालना येथील अंतरवाली सराटी येथे मोठ्या स्वरूपात पार पडणार आहे. या सभेसाठी मराठा समाजातर्फे जय्यत तयारीदेखील सुरू करण्यात आली आहे. पण दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यावरून नाराज असलेले मंत्री छगन भुजबळ हे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या. त्यांना ओबीसी आरक्षणात वाटेकरी करू नका. अशा मागणीवर ठाम आहेत. यातून जरांगे आणि भुजबळ वादाला ठिणगी पेटली.  त्यातच आता १४ ऑक्टोबरला होणाऱ्या जरांगे यांच्या सभेवरुन राज्याचे अन्न व नागरी पूरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे, याबाबतची एक ऑडिओ क्लिपदेखील मध्यंतरी व्हायरल झाली होती. दरम्यान, ही क्लिप त्यांचीच असल्याचे भुजबळांनी  मान्यदेखील केले आहे.(Chhagan Bhujbal) 

Nashik | ‘राजकारणी माझ्या मुलाचा एन्काउंटर करतील’; ललित पाटीलच्या आईला भीती 

 नेमकं या ऑडिओ क्लिपमध्ये आहे काय?
‘आता आम्ही असं  ऐकलंय की …सभेसाठी मोठी तयारी सुरू आहे… १००  एकर जमीन घेतली आहे . १० कोटी रुपये जमा केले आहेत…लाखो लोकांची सभाही  होणार आहे. आणि यात मागणी करणार आहेत की ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्या.  १० रुपये कुणी कोणाला असंच देत नाही, इथे  १० कोटी रुपये त्यांना काढून दिले ना लोकांनी…हे पैसे येतात कुठून?  १००  एकर जागा. ऐवढी शेती साफ करून. हे सगळं करायचं. हे काही कमी नाही. ५४% जरी म्हटलं तरी आपण ७ कोटी आहोत’, असं छगन भुजबळ यांनी या क्लिपमध्ये म्हटलं  आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!