Nashik | पाटलीनबाई म्हणता, राजकारणी माझ्या पोराचा एन्काऊंटर करणार

0
1

Nashik | ड्रगमाफिया ललित पाटील पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेला आहे. या प्रकरणाला राजकीय वळण मिळालेले आहे तसेच या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, त्याची सर्व स्तरावर चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे आज या प्रकरणाला आणखी एक नवे वळण मिळालेले आहे. नाशिक येथील एका कारखान्यात तीनशे कोटींचे ‘MD’ ड्रग्ज सापडलेले होते. याबाबत मुंबई, पुणे तसेच नाशिक अशा तीन शहरांतील पोलिसांसह पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर विविध आरोप होताना दिसत आहेत. राजकीय वळण मिळाल्याने सत्ताधारी मंत्री तसेच विरोधी पक्षांनी या प्रकरणावरून एकमेंकावर गंभीर आरोप केलेले आहेत. हे आरोप थेट पोलिस यंत्रणा तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी देखील विविध प्रश्न निर्माण करत आहेत.

या पार्श्वभूमीवर ललित पाटील याची आई भाग्यश्री पाटील यांनी आज पोलिसांवर गंभीर आरोप केल्याने शहरात खळबळ उडालेली आहे.

अत्यंत हाय प्रोफाइल बनलेल्या या प्रकरणी त्या म्हणाल्या, ‘ललित पाटील याला असेल तिथे पकडावे. आमचे पुर्ण सहकार्य राहील. पंरतु त्याचा एन्काउंटर करू नये.’ पुढे त्या असंही म्हणाल्या, ‘काल साध्या वेशातील एक पोलिस कर्मचारी आमच्या घरी आलेला होता. त्याने मला असेही सांगितले ललित पाटीलला पोलिस शोधत आहेत. ललितचा एन्काउंटर करणार असल्याची माहिती त्या कर्मचाऱ्याने मला दिली आहे.’

‘सध्या या प्रकरणात राजकारण केलं जात आहे. यात काही लोकांचे राजकारण असून या मंडळींकडून माझ्या मुलाचा एन्काउंटर होण्याची भीती मला वाटते आहे. त्यांनी तसं करू नये अशी माझी हात जोडून विनंती आहे.’ आपल्या निवासस्थानी त्यांनी काही पत्रकारांशी बोलताना हतबल होत, हे विधान केलेलं आहे.

BIG NEWS | २५ टक्के कमिशनची मागणी करतांय सरपंच आणि ग्रामसेवक

काय आहे प्रकरण?

पुण्यातील ससुन रुग्णालयात तब्बल अडीच कोटींचे ड्रग्स पडकल्यानंतर ड्रग्स माफिया लतील पाटीलची पोलखोल झाली. त्या घटनेनंतर ललित हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला आहे. त्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून गेल्या दोन आठवड्यापसून ड्रग्स तस्करीचे हे प्रकरण राज्याच्यात चांगलेच चर्चेत आलेलं आहे. दरम्यान, याचा मास्टर माइंड असलेल्या ललित पाटीलने येरवडा कारागृहात असतानाच ड्रग्स तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊन दोन वर्षात तस्करीचे मोठे जाळे उभरल्याचं तपासात उघड झालेले आहे. ड्रग्स तस्कर ललित पाटीलला इतर २२ जणांना चाकण पोलीस ठाण्यातील गुन्हयात डिसेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आलेली होती. तेव्हा पासून ललित कारागृहात होता. दरम्यान, ललितने कारागृहातील एका नायजेरियन तरुणाच्या मदतीने मेफेड्रोन ड्रग्स तयार करण्याचे प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्याने केवळ दहा-बारा दिवसात १३२ किलो मेफेड्रोन तयार केलेले होते. ललित पाटीलने यानंतर कारागृहातूनच ड्रग्स तस्करीचे रॅकेट तयार केलेले आहेत. यासाठी तो पुण्यातील ससुन रुग्णालयातील आजारपणाच्या नावाखाली थांबला होता. या काळात त्याने अनेक अधिकाऱ्यांना लक्ष्मी दर्शन करून आपला व्यवसाय वाढविल्याची माहिती आहे. यामुळेच येरवडा जेल प्रशासन, ससुनचे अधिकारी पोलिस अधिकारी अडचणीत आलेले आहे. ललित पाटीलने त्याचा भाऊ भूषण पाटील याच्या सोबत नाशिकमध्ये थेट ड्रग्स तयार करण्याचा कारखानाच उभारला आहे. येथूनच तब्बल दोन कोटी १४ लाख रुपयांचे ड्रग्स पुण्यात ससुन रुग्णालयासमोर विक्रीसाठी आणलेले होते.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here