महाराजस्व अभियान : सर्वतीर्थ टाकेद | सिन्नर-इगतपुरी मतदार संघातील टाकेद गटातील नागरिकांचे विविध प्रश्न समस्या स्थानिक ठिकाणी सोडविण्याच्या हेतूने मतदार संघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारावकर यांची भेट घेत पूर्व भागात टाकेद येथे शिबिराचे आयोजन करण्याची मागणी केली होती. याच उद्देशाने तहसीलदार बारावकर यांनी तात्काळ आदेश काढत सर्व विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व टाकेद गटातील चाळीस वाड्या, वस्त्या व वीस पंचवीस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील एकमेव मध्यवर्ती केंद्रबिंदू असलेल्या सर्वतीर्थ टाकेद येथे बुधवार 31 जुलै रोजी सर्वतीर्थ तुकाराम लॉन्समध्ये महाराजस्व शिबिराचे आयोजन केले होते. बुधवार ता.12 वाजता या शिबिराला सुरुवात करण्यात झाली. कार्यक्रमाच्या ठिकाणी तहसीलदार अभिजित बारावकर यांनीही भेट दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संयोगाचे नायब तहसीलदार विजय भंडारे हे होते. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कन्या मा. जि.प. सदस्या सीमंतिनी कोकाटे, तालुका कृषी अधिकारी रामनाथ मडके, पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार भागवत ढोणे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, पुरवठा निरीक्षक गोसावी, भूमी अभिलेख इगतपुरीचे जाधव, आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी सोपे, संयोगाचे महेश कुलकर्णी, अधिकारी बांबळे, डॉ.भारती फुले, माजी जि.प सदस्य केरु खतेले, माजी पंचायत समिती उपसभापती पांडुरंग वारुंगसे,
Igatpuri | टाकेद गटात महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन
पं.स. सदस्य नामदेव साबळे, टाकेद बिटाच्या सीडीपीओ पूर्वा दातरंगे, भाजप जिल्हा सरचिटणीस पल्लवी शिंदे, दौलत बांबळे, डॉ.श्रीराम लहामटे, नवनाथ निर्मळ, भगवान भोईर, मा.सरपंच जयराम साबळे, सरपंच जनार्धन शेने, शिवाजी मोंढे, चिंधु नांगरे, आबाजी बारे, मंडळ कृषी अधिकारी भास्कर गीते, महिला व बालविकास प्रकल्प चे पंडित वाकडे, मंडळ अधिकारी रुपाली साळवे, तलाठी सचिन कराते, गोरख मदगे, धोंडीराम कातोरे आदींसह सर्वच विभागाचे अधिकारी पंचक्रोशीतील सर्वच गावचे आजी माजी सरपंच या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित होते. आमदार माणिकराव कोकाटे यांचे स्वीय सहाय्यक संजय डावरे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी प्रास्ताविक करून सर्व मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसिलदार विजय भंडारे, तालुका कृषी अधिकारी रामनाथ मडके यांनी सर्व पंचक्रोशीतुन आलेल्या उपस्थित ग्रामस्थ नागरिकांना शासनाच्या विविध योजनेसंदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर संजय गांधी योजनेचे जेष्ठ नागरिक लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. इगतपुरी तहसील कार्यालयामार्फत पुरवठा विभागाकडून जवळपास दोनशे नागरीकांचे नाव कमी नाव समावेश रेशनकार्ड जागेवरच सोडविण्यात आले व दुय्यम शिधापत्रिका, नवीन शिधापत्रिका व डाटा एन्ट्री असे एकूण चारशे लोकांची कागदपत्रे पूर्ण करून घेण्यात आली. दरम्यान या महाराजस्व शिबिरात शिधापत्रिका संदर्भात असलेले विविध प्रश्न जागेवरच सोडविण्यात आले. लाडकी बहीण, शिधापत्रिका, विविध दाखले व अर्ज अश्या प्रश्नांसाठी लाभार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका मंगल डोळस यांनी केले.
भूमी अभिलेख, आरोग्य अधिकारी, महसूल शाखा, पुरवठा विभाग, संजय गांधी योजना, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका कृषी विभाग, सर्व संबंधित महा इ सेवा केंद्र, आधार संचालक, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी विभाग, पंचायत समिती कृषी विभाग, पंचायत समिती घरकुल विभाग या सर्व विभागांच्या अधिकारी वर्गासह परिसरातील मंडळ अधिकारी, सर्व तलाठी, सर्व ग्रामपंचायत ग्रामसेवक, रेशन दुकानदार, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग कर्मचारी, आशा सेविकांसह परिसरातील बहुसंख्य ग्रामस्थ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
“स्थानिक ठिकाणीच ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी वर्षभरातून एकदा तरी अश्या शिबिराचे आयोजन करण्यात येईल.अनेक ग्रामस्थांचे लाडकी बहीण योजणेकामी शिधापत्रिकांचे प्रश्न जागेवर सुटल्याने समाधान व्यक्त होत आहे.”
– सीमंतिनी कोकाटे (मा. जि.प सदस्या)“इगतपुरी तहसील मार्फत घेण्यात आलेल्या महाराजस्व अभियान शिबिराचा शेकडो नागरिकांना फायदा झाला,यात लाडकी बहीण,संजय गांधी योजनेसह विविध योजना अर्ज दाखले,शिधापत्रिकांचे प्रश्न जागेवर सोडविण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते.”
– राम शिंदे (सामाजिक कार्यकर्ते)“टाकेद येथे घेण्यात आलेल्या महाराज्यस्व अभियान शिबिरात शेकडो नागरिकांचे सर्वाधिक शिधापत्रिकांचे प्रश्न सोडविण्यात आल्याने समाधान वाटले.”
– विजय भंडारे (नायब तहसीलदार, इगतपुरी)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम