Ladki Bahin Yojna | नाशकातून अजित पवारांचा योजनेबाबत खुलासा; तर, थेट निवृत्त होण्याचेही आव्हान 

0
59
Ladki bahin yojana
Ladki bahin yojana

Ladki Bahin Yojna | नाशिक :  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली असली तरी या योजनेबाबत रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. यातच गेल्या काही दिवसांपूर्वी अर्थ विभागाचा योजनेला विरोध असल्याच्या बातम्या माध्यमांवर झळकत होत्या. राज्य सरकारच्या तिजोरीत आधीच खडखडाट असल्याने अर्थमंत्री अजित पवारांच्या अर्थ खात्याने एवढा निधी आणायचा कुठून..? असा आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, यावर स्वतः अजित पवारांनी (Ajit Pawar) स्पष्टीकरण दिले आहे.

महायुती सरकारने पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (CM Lakdi Bahin Yojna) घोषणा केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहे. आतापर्यंतच्या प्रतिसादावरून राज्यातील तब्बल 2 कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरु शकतात, असा अंदाज आहे.

या महिन्यात महिलांना दोन महिन्यांचे पैसे मिळणार 

दरम्यान, यावर अखेर अजित पवारांनी खुलासा केला असून, ते म्हणाले की, “या अधिवेशनात मी दहावा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर माझ्यावर दोन दिवस टीकाही झाली. अर्थ संकल्प मांडत असताना योजनांसाठी निधी नाही, अशी टीका करण्यात आली. निधीमुळे लाडकी बहिण योजनेला माझा कधीही आक्षेप नव्हता. वेगवेगळ्या प्रकारच्या मध्यमांमध्ये बातम्या देऊन जनतेत गैरसमज पसरवायचा. या योजना म्हणजे चुनावी जमला आहे, अशी टिका झाली. मात्र, या ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे पात्र महिलांना मिळतील. गरीब वर्गाला कशी मदत होईल, हाच आमचा प्रयत्न असल्याचे अजित पवार म्हणाले.

Ladki Bahin Yojna | लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना १५०० रुपयांसोबत ३ गॅस सिलेंडरही मिळणार

Lakdi Bahin Yojna |  माझी बदनामी करण्याचे काम चालू

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवार हे महायुतीत सामील होण्यापूर्वी बेश बदलून दिल्लीला जायचे. अशा बातम्या समोर आल्या होत्या. यावरही अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. “काही राजकीय लोकांनी असे स्टेटमेंट केले आहे की, अजित पवारांनी मधल्या काळात जो निर्णय घेतला. त्यावेळी अजित पवार हे वेश बदलून दिल्लीला जायचे. हे सर्व बदनामी करण्याचे काम चालू आहे. हे सर्व धादांत खोटं आहे. कोण बहुरूपी म्हणतंय त्याला लाज लज्जा शरम वाटायला पाहिजे, असे यावेळी अजित पवार म्हणाले.

…तर मी राजकारणातून निवृत्त होईल, अजितदादांचे ताईंना आव्हान 

त्यात तो सकाळचा भोंगा वाजतो आणि त्याने काही बोलले. तुम्हाला मी वेश बदलून जायचो याचा माझ्या बाबतीत कुठे पुरावा मिळाला. मी मास्क घालून गेलो मिशा लावल्या असे बोलले. जर हे सिद्ध झाले तर मी राजकारणातून निवृत्त होईल, असे थेट आव्हान यावेळी अजित पवारांनी खासदार सुप्रिया सुळे यांना दिले आहे. खरतर मी यावर काही बोलणार नव्हतो, आम्ही गोर गरिबांसाठी काम करत असून, याठिकाणी आम्ही योजनेच्या बाबतीत माहिती देणार होतो. या शब्दांत अजित पवारांनी विरोधकांना थाट आव्हान देत घेरले आहे.

Ladki Bahin Yojna | नाशिकमध्ये लाडक्या बहीणींचे अर्ज लाखाच्या वर; ग्रामीण भागातील महिलांची आघाडी


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here