सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रातल्या बहिणी आनंदित आहेत हे तुमचं म्हणणं खरं आहे. पण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेले तुमचे भाचे अद्याप गणवेशविना आहेत. याकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याची खंत ग्रामीण भागातील पालकांनी व्यक्त केली आहे. १५ जूनपासून राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या असून, शासनामार्फत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. या शाळांमध्ये बहुतांश सर्वसामान्य, आदिवासी कुटुंबातील विद्यार्थी प्रवेश घेतात.
Maharashtra Schools | शाळांबाबत मोठा निर्णय; शिक्षकांची प्रतिष्ठा वाढणार
या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने गणवेश शिवण्यासाठी शाळांना कापड पुरवला जातो. मात्र शाळा सुरू होऊन तब्बल अडीच महिने उलटले तरीही अद्याप ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गणेश वाटप करण्यात आलेले नाही. एकीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन दिला. मात्र गरीब भाच्यांना साधा गणवेश उपलब्ध होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गंभीर समस्येवर स्थानिक लोकप्रतिनिधी देखील बोलायला तयार नसल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ZP School : निधी उपलब्ध असूनही वर्गांची दुरुस्ती नाहीच ; नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था
जिल्हा परिषदेच्या शाळेत मोफत शिक्षणाबरोबर इतरही सुविधा मिळत असल्याने ग्रामीण भागातील पालकांचा या शाळेकडे कल असला तरी अशा प्रकारच्या अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागते. गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्वातंत्र्य दिनालादेखील विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशात झेंड्याला मानवंदना दयावी लागली ही शोकांतिका आहे. दरम्यान लोकप्रतिनिधींनी लाडक्या बहीण योजने बरोबरच आता लाडक्या भाच्यांकडे देखील लक्ष केंद्रित करावे अशी मागणी ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून केली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम