सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा तालुक्यातील वाजगाव येथे शुक्रवारी (दि.१६) रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी बस थांब्यानजीक असलेली तेरा दुकाने फोडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर घटनेची माहिती दुकानदारांनी येथील पोलीस पाटील निशा देवरे यांच्यामार्फत देवळा पोलीस ठाण्यात दिली. सकाळी घटनास्थळी वाजगाव बीटचे पोलीस हवालदार गवळी, शिंदे , बर्डे यांनी भेट देऊन पंचनामा केला.
Deola Crime | ‘या’ दुकानांमध्ये चोरी
या घटनेत वाजगाव येथील संदीप देवरे यांचे अक्षर किराणा स्टोअर्स, जगन्नाथ आहेर यांचे गणेश वेल्डिंग वर्कशॉप, वैभव पवार यांचे वक्रतुंड मेडिकल, शुभम पवार यांचे पवार ॲग्रो सर्विसेस, भाऊसाहेब काकुळते यांचे किराणा दुकान, संदीप देवरे यांचे किराणा दुकान, शैलेंद्र देवरे यांचे किराणा दुकान, प्रशांत पगारे यांचे सलून सेंटर, विनोद महाले यांचे टेलरिंग सेंटर, विकास देवरे यांचे आपले सरकार सेवा केंद्र, गणेश बच्छाव यांचे झेरॉक्स दुकान, पांडुरंग देवरे यांचे मोटर रिवायडींग, पुंडलिक देवरे यांचे किरकोळ किराणा दुकान,
Deola Crime | देवळ्यात भरदिवसा घरफोडी; चोराने रोख रक्कम व सोने केले लंपास
दिलीप पगारे यांचे सलून सेंटर, किरण नलगे यांचे किराणा दुकान, बाळू महाले यांचे किराणा दुकान अशा जवळपास तेरा दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलप तोडून गल्ल्यातील शिल्लक रकमेवर डल्ला मारला. या प्रकाराने वाजगाव व परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या सर्व दुकानांपैकी सर्वाधिक जास्त पुंडलिक शंकर देवरे यांच्या किराणा दुकानात 8000 रुपयांची रोकड पळवली गेली आहे. देवळा पोलिसांत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Deola Crime | देवळ्यात चोरांचा सुळसुळाट; भरदिवसा चोरट्यांनी सेवानिवृत्त शिक्षकाला लुबाडले
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम