Jansanman Yatra | महायुतीतील वाद चव्हाटयावर; भाजपने अजित पवारांना दाखवले काळे झेंडे

0
44
Jansanman Yatra
Jansanman Yatra

Jansanman Yatra : पुणे |  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा ही राज्यभरात सुरू आहे. या यात्रेतून अजित पवारांची जोरदार पब्लिसिटी सुरू आहे. आज ही यात्रा अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुण्यात दाखल झाली आणि येथे संपूर्ण महाराष्ट्राला अचंबित करणारी घटना घडली. महायुतीत (Mahayuti) अंतर्गत खदखद असल्याचे अनेक वृत्त गेल्या दिवसांत पहायला मिळाले. मात्र, हा वाद आता थेट चव्हाटयावर आला असून, अजित पवारांच्या या जनसन्मान यात्रेला भाजपच्या माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार घडला आहे. तसेच यावेळी या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

Jansanman Yatra | राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा देवळ्यात; नेतेमंडळींची देवळा वासीयांना साद

Jansanman Yatra | नेमकं प्रकरण काय ..?

अजित पवारांच्या (Ajit Pawar) जनसन्मान यात्रेचा पहिला टप्पा सुरू असून, आज ही यात्रा जुन्नर तालुक्यात दाखल झाली. यावेळी भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह भाजपच्या अनेक महिला कार्यकर्त्यांनी अजित पवार आणि त्यांच्या गुलाबी ताफ्याला काळे झेंडे दाखवले आणि जोरदार घोषणाबाजीही केली.(Jansanman Yatra)

जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असून, शासकीय कार्यक्रमात महायुतीच्या घटक पक्षांना सतत डावललं जातं, असे आरोप या महिला पदाधिकारी आणि भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांनी केले आहे. तसेच अजित पवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री असून, त्यांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही, याबद्दलही त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. हा संपूर्ण प्रकार नारायणगांव येथे घडला. या घटनेनंतर झेंडे दाखवणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Jansanman Yatra | देवळ्यातील जनसन्मान यात्रेतून राष्ट्रवादीच्या नव्या कारकीर्दीचा ‘उदय’

भाजप पदाधिकाऱ्यांचं म्हणणं काय..?

“आमचा जुन्नर (Junnar) तालुका पर्यटन तालुका म्हणून प्रसिद्ध असून, पर्यटन तालुक्यात त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम व्हायला हवीत. पण ते ज्या पद्धतीने चोरुन चोरुन बैठक घेतात. ते प्रचारसभांचा गैरवापर करत असून, जर त्यांना महायुती मान्य नसेल तर त्यांनी तसं स्पष्ट सांगावं. माझा काहीही संबंध नाही, असे अजित पवारांनी स्पष्टपणे घोषित करावे. आम्हाला काल  समजलं की आज येथे राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार आहे. तहसीलदार, कलेक्टर या सर्वांना घेऊन बैठकी घेतल्या जातात. या बैठकांमध्ये नेमकं काय दडलंय ? हे आम्हालाही समजलं पाहिजे. तो आमचा हक्क आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा फोटो गायब करतात. जर तुम्हाला महायुती मान्य नसेल, तर तसं अजित पवारांनी स्पष्ट करावं”, अशी आक्रमक भूमिका भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांनी मांडली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here