Gold Rate | सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच परफेक्ट वेळ; वाचा १० ग्रॅमची किंमत

0
14

Gold Rate | सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या किरकोळ भावांनी शुक्रवारी (दि.२० ऑक्टोबर) सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या ( IBJA) आकडेवारीनुसार, शुक्रवारी सोन्याचा 24 कॅरटचा भाव 10 ग्रॅमसाठी 653 रुपयांनी वाढून 60,693 रुपये इतका झाला. चांदीचा भाव किलोसाठी 667 रुपयांनी वधारत 71,991 रुपये नोंदवला गेला.  ऐन सणासुदीच्या दिवसांत तसेच लग्नसराईचा काळ सुरू झालेला असताना सोने-चांदी मोठ्या प्रमाणावर महाग झाल्याने सर्वसामान्यांचे खरेदीचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
सोन्याला वित्तीय क्षेत्र आणि गुंतवणूक यामध्ये फार महत्त्व आहे. तसेच सणासुदीला आणि लग्नसमारंभानिमित्त देखील सोन्याला प्राधान्य दिले जाते. याशिवाय आर्थिक आणि राजकीय वातावरण अस्थिर झाले की सर्वसामान्य नागरीक, देशांच्या मध्यवर्ती बँका आणि सरकारं देखील सोन्यात गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत असतात. शुक्रवारी सोने उसळण्यामागे इस्रायल-पॅलेस्टाइन युद्ध आणि त्यामुळे आखाती प्रदेशात निर्माण झालेले अस्थिर वातावरण आहे. याचवेळी सातत्याने वधारणारा कच्च्या खनिज तेलाचा दर या दोन्हीही गोष्टी कारणीभूत ठरलेल्या आहेत.
सोन्याचा भाव मागील तीन ते चार दिवसांत 10 ग्रॅमसाठी सुमारे तीन हजार रुपयांनी वधारल्याचे काही सराफांनी सांगितले आहे. यामुळे नवीन सोने खरेदी करण्याचे ग्राहक टाळत असल्याचे दिसुन येत आहे. त्याऐवजी जुने सोने देऊन, त्यात थोडी भर घालून नवा दागिना करण्याकडे खरेदीदारांचा कल वाढू लागलेला आहे. सोने एक्सचेंज करून त्याबदल्यात नवे सोने खरेदी करण्याचे प्रमाणदेखील वाढू लागल्याचे दिसत आहे.

सोन्याचा शुक्रवारी असलेला भाव (प्रति १० ग्रॅम)

कॅरेट शु्द्धता भाव

२४ ९९९ ~ ६०,६९३

२४ ९९५ ~ ६०,४५०

२२ ९१६ ~ ५५,५९५

१८ ७५० ~ ४५,५२०

१४ ५८५ ~ ३५,५०५

दसऱ्यापर्यंत सोने 62 हजारांपुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. इस्रायल-पॅलेस्टाइन युद्धामुळे निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणामुळे लोकांनी आर्थिक साधनांमधील गुंतवणुकीपेक्षा सोने घेण्याला अधिक पसंती दिल्याचे दिसुन येत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here