Agriculture| राज्यातील प्रमुख शेतमालाचे दर ढासळले आहेत. तरीही अद्याप शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासकीय धान्य खरेदीसाठी कुठल्याही प्रकारची तयारी, सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या स्वरूपात आर्थिक नुकसान होत आहे. उत्पादनावर आधारित शेतीमालाच्या दरांचा मुद्दा राज्यभरात ऐरणीवर आहे.राज्यभरात सध्या कापूस, सोयाबीन आणि मका या शेतमालाचे दर हमीभावापेक्षाही कमी आहेत. मका व सोयाबीनही प्रमुख पिके आहेत. सगळीकडे मका, सोयाबीनची मळणी वेगात सुरू आहे. अनेकांच्या मका, सोयाबीनची मळणी होऊन हा शेतमाल बाजारातही आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम