Skip to content

Gadkari | ‘गडकरी’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज; गडकरींच्या भूमिकेत अमराठी चेहरा


Gadkari | नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर आऊट झालेला असून प्रेक्षक सिनेमाची प्रतिक्षा करत आहेत.  या सिनेमात नितीन गडकरी यांची भूमिका अमराठी अभिनेता साकारणार आहे. अभिनेता राहुल चोपडा नितीन गडकरींच्या भूमिकेत दिसत आहे. 

Maharashtra Politics| ठाकरेंना मोठा धक्का..! तीन मोठे नेते शिंदेंच्या गळाला

नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार अमराठी अभिनेता राहुल चोपडा

नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा हा अभिनेता साकारणार आहेत. तर त्यांच्या पत्नीची म्हणजेच कांचन गडकरी यांची भूमिका अभिनेत्री ऐश्वर्या डोरले साकारणार आहे. नितीन गडकरी यांच्या भूमिकेत राहुल चोपडा चपखल बसताना दिसले आहेत.  त्यांची देहबोली, संयमी स्वभाव, कठोर तरीही प्रसंगी हळवे मन या विविध छटा अभिनेते राहुल चोपडा यांनी उत्तम साकारलेल्या आहेत. अभिनेते राहुल चोपडा हे अमराठी असून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे.  राहुल चोपडा हे अभिनेते असून अनेक सिनेमांत त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवलेली आहे. पण ‘गडकरी’ या सिनेमाने त्यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळणार आहे.

अभिनेते राहुल चोपडा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ‘गडकरी’ सिनेमाबद्दल माहिती दिलेली आहे.

“जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे.”
समाजहितासाठी प्रगतीचे आणि विकासाचे नवे मार्ग बनविणारे ‘गडकरी ते रोडकरी.’
सादर करीत आहोत, भारताचे केंद्रीय मंत्री ‘श्री. नितीनजी गडकरी’ यांच्या आजवरच्या कारकीर्दीवरील आधारित बहुचर्चित ‘गडकरी’ चित्रपटाचा हा उत्कंठावर्धक ट्रेलर !
‘गडकरी’ २७ ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहांत.

El-Nino | शेतकऱ्यांनो उन्हाळी पीक घेताय तर ही बातमी नक्की वाचा नाहीतर….

‘गडकरी’ सिनेमाचा ट्रेलर आऊट!

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी ओळख असणाऱ्या नितीन जयराम गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच नागपुरमध्ये दिमाखात पार पडला. या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय क्रिकेटर उमेश यादवसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी चित्रपटात नितीन गडकरी यांची भूमिका साकारणारे अभिनेते राहुल चोपडा यांनी ‘गडकरी’ शैलीने उपस्थित राहून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.

या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये ‘गडकरी’ ते ‘रोडकरी’चा प्रवास दिसत आहे. मंत्री नितीन गडकरी यांचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. त्यांच्या या कारकिर्दीतील चढ-उतार ट्रेलरमध्ये दिसत आहेत. त्यांचे राजकीय व खासगी आयुष्य या चित्रपटातून उलगडणार आहे. ‘जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे’ असे मानणाऱ्या मंत्री गडकरी यांचा असामान्य प्रवास २७ ॲाक्टोबरपासून प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहता येणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!