Skip to content

Maharashtra Politics| ठाकरेंना मोठा धक्का..! तीन मोठे नेते शिंदेंच्या गळाला

Shivsena Result

Maharashtra Politics|  सत्ता पालट झाल्यापासुन  गळती लागलेल्या उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये पुन्हा एकदा कमालीची अस्वस्थतता वाढली आहे. वर्षभरात अनेक आजी- माजी नगरसेवक तथा आमदारांनी ठाकरे गटाला टाटा करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली आहे. पुन्हा एकदा असंच काहीसं होण्याची चिन्हे दिसत आहे.  दोन्ही गटांचा दसरा मेळावा हा अगदीच काही दिवसांवरयेऊन ठेपला असताना. आता त्याआधीच मोठे राजकीय धमाके होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दसरा मेळावा हा शिवसेनेचा मोठा मोठा उत्सव असतो. मागील वर्षी शिवसेनेत जी फुट पडली, तेव्हापासून शिवसेनेच्या दोन गटांचे दोन वेगळे मेळावे होत आहेत. दरम्यान, यंदाही उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात होणार आसून, शिंदे गटाचा मेळावा हा दक्षिण मुंबईतील मैदानात होणार आहे. पण त्याआधीच उद्धव ठाकरे गटात मोठे राजकीय फटाके फुटतांना दिसत आहेत. पक्षाला लागलेली ही गळती रोखण्यासाठी वरिष्ठांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरूआहेत. नुकतंच उद्धव ठाकरे गटाने त्यांच्या कार्यकारिणीचा विस्तार केला.

El-Nino | शेतकऱ्यांनो उन्हाळी पीक घेताय तर ही बातमी नक्की वाचा नाहीतर….

पण या विस्तारामुळे पक्षांतर्गत नाराजीचा सूर उठतांना दिसत आहे. वरळी मतदारसंघाचे आमदार सुनिल शिंदे, मिलिंद नार्वेकर, यांच्यासह आणखीही काही जुने शिवसैनिक नाराज असल्याची माहिती मिळाली आहे. आपली खदखद त्यांनी पक्ष प्रमुखांसमोर बोलूनही दाखवल्याचे सांगण्यात येत आहे. दोन दिवसांतच काही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रात्रीच ठाकरे गटाच्या तीन मोठ्या नेत्यांनी शिंदेंच्या मंत्र्यांसोबत चर्चा केल्याचीदेखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे  हे नेते आता शिंदेंच्या गटात जाणार का?  याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहे. उबाठा गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार करताना सहा नव्या नेत्यांची नियुक्ती केली गेली. यात विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे, रवींद्र वायकर, भास्कर जाधव आणि सुनील प्रभू या सहा जणांचा यात समावेश केला गेला आहे.

कोण आहेत नाराज आमदार?

पक्ष कार्यकारिणीच्या ह्या विस्तारामुळे पक्षातील काही मोठे नेते नाराज आहेत. त्यात वरळीचे आमदार सुनिल शिंदे हे एक मोठे नेते आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. २०१४ मध्ये ते वरळी  मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांच्यामुळे त्यांनी निवडणूक लढवली नाही.  नंतर पक्षाने त्यांना आणि  सचिन अहिर यांना विधानपरिषदेवर निवडून आणलं. सुनिल शिंदे हे आमदार होण्याआधी अनेक वर्ष नगरसेवक होते. वरळीमध्ये शिवसेनेचा पाया भक्कम करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. (Maharashtra Politics)

Maharashtra politics| महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप?…


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!