El-Nino | शेतकऱ्यांनो उन्हाळी पीक घेताय तर ही बातमी नक्की वाचा नाहीतर….

0
27
Cracks run through the partially dried-up river bed of the Gan River, a tributary to Poyang Lake during a regional drought in Nanchang, Jiangxi province, China, August 28, 2022. REUTERS/Thomas Peter

El-Nino | मॉन्सून यंदा उशिराने आला असुन नेहमी 7 जूनला महाराष्ट्रात दाखल होणारा मॉन्सून यंदा 25 जून रोजी दाखल झाला. त्यानंतर जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र ऑगस्ट महिन्यात तब्बल 21 दिवस पावसाने दडी मारली. सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला असला तरी मोठ्या पावसाची मात्र अपेक्षाच राहीली. यामुळे यंदा जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने निर्माण केलेली तूट भरुन निघालेली नाही. भारतीय मॉन्सूनवर यंदा El-Nino चा प्रभाव होता. आता मग प्रश्न हा की, यंदा उन्हाळा कसा असणार? या संदर्भात हवामान विभागाने अपडेट दिलेले आहेत. यंदा उन्हाळ्यात ‘Super El-Nino’चा प्रभाव असणार आहे.

पावसाळ्यानंतर येत्या उन्हाळ्यात ‘Super El-Nino’चा प्रभाव असणार आहे. मार्च ते मे 2024 मध्ये ‘Super El-Nino’चा प्रभाव दिसणार आहे. यामुळे सरासरी तापमान 1.5 अंश सेल्सियस जास्त असणार आहे. तर सरासरी तापमान 2 अंश सेल्सियसपेक्षा जास्त असण्याची शक्यताही 30 टक्के वर्तवण्यात आलेली आहे. यंदा प्रशांत महासागरातील ‘El-Nino’ स्थितीची तीव्रता वाढल्याचा हा संपुर्ण परिणाम आहे. अमेरिकेतील ‘National Oceanic and Atmospheric Administration’ (नोआ) या संस्थेने हा अंदाज वर्तवलेला आहे. यासंदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाने दिलेली आहे. यापूर्वी या संस्थेने यंदाच्या पावसाळ्यात भारतात ‘El-Nino’चा प्रभाव असण्याचे म्हटलेले होते.

यापूर्वी कधी जाणवला होता ‘Super El-Nino’चा प्रभाव?

‘Super El-Nino’चा प्रभाव भारतात यापूर्वी सात-आठ वर्षांपूर्वी होता. 1997-98 मध्ये ‘Super El-Nino’ होता. त्यानंतर पुन्हा 2015-16 मध्ये ‘सुपर एल निनो’चा प्रभाव जाणवला होता. ‘Super El-Nino’मुळे वाढलेले तापमान, दुष्काळ आणि पूर अशा आपत्ती निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच आता या ‘Super El-Nino’मुळे देशातील मॉन्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Deola |  “प्रहार” चे “बिऱ्हाड” तहसील कार्यलयावर…

काय परिणाम होणार?

Super El-Nino मुळे भारतातील हवामान मोठा बदल होण्याचा धोका आहे. या परिस्थितीत तीव्र हवामानाशी निगडीत घटना घडतात. कधी काही भागात मुसळधार पाऊस पडतो तर कुठे तापमान वाढलेलेअसते. तसेच पावसात मोठा खंडदेखील पडतो. उत्तर भारतात ‘Super El-Nino’चा धोका दक्षिण भारतापेक्षा अधिक वर्तवलेला आहे. हवामान खात्याच्या या इशाराऱ्यानंतर अन्नधान्याचा साठा सरकारला करुन ठेवावा लागणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here