IRCTC Vaishno Devi Package| ह्या नवरात्रीत फक्त ८ हजारांत करा वैष्णोदेवीचे दर्शन…

0
12

IRCTC Tour Package : तुम्ही देखील नवरात्रीत वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमचीसाठी. IRCTC ने नवरात्रिनिमित्त भाविकांसाठी एक विशेष टूर प्लॅन आणला आहे. या प्लॅनमुळे आता तुम्हाला फक्त ८ हजारांत वैष्णोदेवीचे दर्शन घेता येणार आहे. सध्या शारदीय नवरात्री उत्सव सुरु आहे.  या नऊ दिवसांत अनेकजण शक्तीपीठांना भेट देत असतात.

जर तुम्ही देखील देवीच्या दर्शनाला जण्याचा प्लॅन करत असाल आणि त्यातही तूमहाल जर वैष्णोदेवीचे दर्शन घ्यायचे असेल तर IRCTC चा हा नवा टूर प्लॅन एकदा बघाच. हे पॅकेज अतिशय परवडणाऱ्या किमतीत भाविकांसाठी उपलब्ध असून ह्या पॅकेजची किंमत फक्त ७२९० रुपये आहे. आणि त्यातही ह्या प्लॅन अंतर्गत प्रवाशांना वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. तसेच आणखीही अनेक सुविधा यात मिळणार आहे.

१. काय आहे हा प्लॅन?  

IRCTC च्या ह्या पॅकेजचे नाव ‘ माता वैष्णोदेवी बाय – वंदे भारत ‘असे आहे. हे पॅकेज एक रात्र आणि दोन दिवसांचे आहे.  पॅकेज बूकिंगची  शेवटची तारीख ही १८ ऑक्टोबरपर्यंत आहे. पॅकेजमध्ये, तुम्हाला वंदे भारत ट्रेनच्या क्लास चेअर कारमध्ये प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. १८ ऑक्टोबरला सकाळी ६ वाजता नवी दिल्ली येथून ही ट्रेन सुटणार आहे.

El-Nino | शेतकऱ्यांनो उन्हाळी पीक घेताय तर ही बातमी नक्की वाचा नाहीतर….

२. ह्या आहेत पॅकेज मधील सुविधा 

ह्या पॅकेजमध्ये १ हॉटेल , १ वेळचा नाश्ता, १वेळ लंच, १ वेळ डिनर आणि ट्रेनचे तिकीट ह्या सुविधांचा समावेश आहे.ही ट्रेन कटरा स्टेशन येथे दुपारी २ वाजता पोहोचणार आहे. तसेच ह्या रेल्वे स्थानकावरुन प्रवाशांना हॉटेलमध्ये पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर बाणगंगा येथे नेण्यात येणार आहे. तेथून प्रवाशांना वैष्णोदेवीची यात्रा सुरू करता . येणार आहे. दुपारी 2 च्या सुमारास हॉटेलमधून चेकआउट केले जाईल. त्यानंतर प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे.

३. ७,२९० रुपयांपासून पॅकेजेस..  

प्रवाशांना ट्रिपल शेअरिंगसाठी ७,२९० रुपये. डबल शेअरिंगसाठी ७,६६० रुपये तसंच सिंगल बुकसाठी ९,१४५ रुपये प्रवाशांना द्यावे लागणार आहे. याशिवाय ५ ते ११ वर्षीय  वयोगटातील मुलांसाठी बेड घ्यायचा असेल तर ६,०५५ रुपये आणि बेड न घेतल्यास ५,५६० द्यावे लागणार आहे. हे टूर पॅकेज बुक करण्यासाठी, तुम्ही IRCTCच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुमचे पॅकेज बूक करू शकतात.  https://www.irctctourism.com/indian-domestic-holidays/delhi-tour-packages (IRCTC Vaishno Devi Package)

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here