Navratri Utsav 2023 | “पटेल समाजाशिवाय प्रवेश नाही” मुंबईत झळकले फलक!!

0
1

Navratri Utsav 2023 |  मुंबईसह संपूर्ण राज्यभरात मराठी आणि गुजराती वाद अद्यापही शांत झालेला नसून आणखी वेगाने डोकं वर काढत आहे. नवी मुंबईतील  कामोठे येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात “पटेल समाजाशिवाय इतरांना प्रवेश नाही” असे थेट  फलक लाऊन प्रवेश नाकारण्यात आला आहे. पटेल समाजाव्यतिरिक्त इतरांना प्रवेश नसल्याचे फलक बघून मनसैनिकांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे.

Maharashtra Politics| ठाकरेंना मोठा धक्का..! तीन मोठे नेते शिंदेंच्या गळाला

मनसेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाविरुद्ध आवाज उठवत कार्यक्रमाच्या आयोजकांची भेट घेतली. आयोजकांची भेट घेऊन मनसे स्टाईलने त्यांच्याकडून झालेली चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. आणि यामुळे आयोजकांनीदेखील लगेचच माघार घेत आपला फलक हटवला आणि इतरही सर्व समाजाच्या व्यक्तींना परवानगी असल्याचा फलक लावणार असल्याचं आश्वासनदेखील दिलंय. तसेच यावेळी आयोजकांनी झालेल्या चुकीबद्दल सर्वांची मफीदेखील मागितलीय.
नुकतंच काही दिवसांपूर्वी मुंबईच्या मुलुंडमधील तृप्ती देवरुखकर यांना देखील ऑफिस साठी जागा नाकारण्यात आल्याचे प्रकरण चांगलेच चिघळले होते. तृप्ती देवरुखकर यांना मूलुंडच्या एका सोसायटीत जागा भाड्याने घेण्यासाठी गेले असता.
तेथील व्यक्तींनी मराठी माणसांना येथे जागा दिली जात नाही. असं सांगण्यात आलं होतं.

या प्रकरणातदेखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे स्टाईलने भूमिका घेत तेथील गुजराती दोषी व्यक्तींना माफी मागायला लावली होती. या प्रकरणानंतर मनसेकडून संतप्त प्रतिक्रिया देत राज ठाकरेंनी काढलेले एक जुनं व्यंगचित्र शेअर केलं होतं.राज्याभरात  सर्वत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू असताना मुंबईत पुन्हा मराठी – गुजराती वाद पेटतांना दिसत आहे. पण येथेही मनसेने स्वत: उपस्थित राहून हा वाद मिटवला. तसेच आयोजकांना चांगलाच समजही दिला आहे.

IRCTC Vaishno Devi Package| ह्या नवरात्रीत फक्त ८ हजारांत करा वैष्णोदेवीचे दर्शन…


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here