Tiger-3 चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; सलमान, कतरिना आणि इमरान हाश्मीचा जबरदस्त लूक समोर

0
1

Tiger-3 | बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा आता प्रेक्षकांना पुन्हा ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. सलमान खानचा Tiger-3 या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झालेला आहे. या ट्रेलरमध्ये टायगर आणि जोया म्हणजेच सलमान आणि कतरिना कैफ हे ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. तसेच या चित्रपटाच्या ट्रेलरमधील इमरान हाश्मीच्या लूकने अनेकांचे लक्ष वेधलेलं आहे.  

ISRO Chandrayaan-3 | नासाची ‘चांद्रयान-3’ चे तंत्रज्ञान विकत घेण्याची तयारी..

Tiger-3 या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला टायगरचं कुटुंब दिसत आहे. त्यानंतर टायगर आणि जोया हे ॲक्शन मोडमध्ये दिसत असतात. ‘जब तक टाइगर मरा नहीं, तब तक टाइगर हारा नहीं..’ हा सलमानचा डायलॉग Tiger-3 या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतोय. Tiger-3 या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपटात टायगर हा देशासाठी व कुटुंबासाठी लढणार आहे असा अंदाज आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी हा खलनायकाची भूमिका साकारणाता दिसणार आहे.  सलमान हा ट्रेलरमध्ये काही स्टंट सीन्स करताना दिसत आहे. त्याबरोबरच कतरिनाचे देखील काही ॲक्शन सीन्स Tiger-3 या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. Tiger-3 चित्रपटाचा हा  2 मिनिटे 51 सेकंदाचा ट्रेलर पाहिल्यानंतर यंदा ‘सलमान हा दिवाळीला बॉक्स ऑफिसवर धमाका करणार’, असा अंदाज सिनेरसिक लावत आहेत.

Nashik | अमली पदार्थ विरोधी नाशिकचे पालकमंत्री ॲक्शनमोडवर

Tiger-3‘ हा चित्रपट  YRF च्या स्पाय युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे. यामध्ये अभिनेता सलमान खानसोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केलेले आहे.  ‘Tiger-3‘ हा चित्रपट या दिवाळीला 12 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहामध्ये येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु या भाषांत प्रदर्शित होणार आहे. सलमान खानने सोशल मीडियावर ‘Tiger-3‘  या चित्रपटाच्या ट्रेलरची झलक असणारा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, टाइगर से दुश्मनी सबको भारी पड़ती है।


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here