Skip to content

Maharashtra | शेतकऱ्यांनो आपली पिके सांभाळा…! 24 तासात अतिवृष्टीचा इशारा


महाराष्ट्रात कोल्हापूरसह कोकण किनारपट्टी या भागांत पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहेत. कोकण परिसरात पुढील दोन ते तीन तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 18 ऑक्टोबरपर्यंत अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता असून त्यानंतर थंडीचा कडाका सुरू होणार आहे. काही भागांत ढगाळ वातावरण राहील तर काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

World Food Day | का साजरा केला जातो जागतिक अन्न दिन ? जाणुन घ्या

तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. भारतीय हवामान विभागाने 16 ते 18 ऑक्टोबर या दोन दिवसांमध्ये काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख या भागातही मुसळधार पावसासह हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!