ISRO Chandrayaan-3 : भारताच्या चांद्रयान-3 ने ऐतिहासिक कामगिरी करत भारताचे नाव जगभरात उंचावले आहे. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला. जगभरात इस्रोच्या ह्या मोहिमेचं कौतुक केलं जात असताना, अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या शास्त्रज्ञांनी इस्रोकडून चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगचे तंत्रज्ञानाची मागणी केली आहे. अशी माहिती इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली. इतकंच नाही तर, नासाने चांद्रयान-3 चे तंत्रज्ञानही विकत घेण्याची तयारी दर्शविली आहे.
अंतराळ मोहिमेत भारत हा एक नवी ताकद म्हणून जगासमोर येत आहे. भारताचे यश हे उल्लेखनीय असल्याचे नासाने मान्य केलं आहे. दरम्यान, नासाने इस्रोला अशी विनंतीही केली की, ‘तुम्ही चांद्रयान-3 कसे बनवले?, तुम्ही त्याची स्वस्त उपकरणे अमेरिकेला का विकत नाही’. रामेश्वरम याठिकाणी १५ ऑक्टोबर रोजी डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशनच्या कार्यक्रमात इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ बोलत होते. यावेळी त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
World Food Day | का साजरा केला जातो जागतिक अन्न दिन ? जाणुन घ्या
नासा इस्रोचे फॅन !!!
एस. सोमनाथ यांनी असेही सांगितले की, आम्ही जेव्हा चांद्रयान-3 विकसित केले, तेव्हा आम्ही नासा-जेपीएल मधील शास्त्रज्ञांना बोलावले होते. नासा-जेपीएलमधील शास्त्रज्ञांनी जगातील अनेक अंतराळ मोहिमा यशस्वीरित्या राबवल्या आहेत. नासा-जेपीएलचे सहा शास्त्रज्ञ त्यावेळी इस्रोच्या मुख्यालयात आले होते. २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग कसे करेल, हे आम्ही त्यांना समजावून सांगितले. त्यांना आम्ही चांद्रयान-३ मोहिमेची रचना समजावून सांगितली. आमच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान ३ कसे बनवले हे देखील सांगितले. या सर्व गोष्टी ऐकून शास्त्रज्ञांनी, सर्व चांगल्या आणि यासविरीत्या पार पडणार असा विश्वासदेखील व्यक्त केला होता.
चांद्रयान-३ प्रक्षेपणानंतर ४१ व्या दिवशी २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर यशस्वीरित्या उतरले आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताची चंद्रमोहिम ही जगातील सर्वात स्वस्त चंद्र मोहिम आहे. यामुळेच नासाही इस्रोचे फॅन झाले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम