Nashik | अमली पदार्थ विरोधी नाशिकचे पालकमंत्री ॲक्शनमोडवर

0
17
Malegaon
Malegaon

Nashik | जिल्ह्यात ड्रग्सचे रॅकेट पोलिसांनी उघडक केल्यानंतर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शहरातील अवैध धंदे चालकांवर कठोर कारवाईचे निर्देश दिलेले आहेत. तरुणाईमध्ये ड्रग्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून तरुणाई आहारी गेल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे फक्त कारवाईवर न थांबता जनजागृती करणे देखील महत्वाचे असल्याने मंत्री दादाजी भुसे यांनी “अमली पदार्थ विरोधी जनजागरण चळवळ” संदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केलेली आहे. (Nashik)

Gas cylinder: काय सांगता…! आता 500 रुपयांना सिलेंडर मिळणार, अन् जुनी पेन्शन…

या बैठकीत जिल्हाधिकारी, नाशिक महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक व प्रार्थमिक), आरोग्य विभाग अधिकारी, अन्न व प्रशासन विभाग अधिकारी, प्रमुख शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, प्रमुख महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच अन्य अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Nashik News | मंत्री छगन भुजबळ यांच्या फोटोवर शाइफेक…

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आधीच अवैध धंदे चालकांची गय केली जाणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिस ॲक्स्शन मोडवर आले आहेत. मंत्री भुसे यांनी ड्रग्स बाबत काही दिवसापूर्वी माहिती मागवली होती त्यानुसार शहरात पोलिस कारवाई करण्यात आली. येत्या काही दिवसात अजून अवैध धंद्यांवर कठोर कारवाई होईल. अवैध धंदा चालकांना पाठीशी घातले जाणार नाही. असा इशारा मंत्री भुसे यांनी दिला येत्या काही दिवसात विशेष पथकांच्या माध्यमातून देखील इतर अवैध धंद्यांवर देखील टाच आणली जाईल. असे सांगण्यात आले आहे.

एका बाजूला पोलिस प्रशासन कारवाई करेलच मात्र त्याचवेळी समाजात विघातक परिणामांची जनजागृती होणे गरजेचे आहे. जी तरुणाई व्यसनाच्या आहारी गेली आहे त्यांचे समाज परीवर्तन होणे गरजेचे आहे. याला अनुसरून काय उपाययोजना आखणे गरजेचे आहे याचा उहापोह या बैठकीत होणार आहे. यावेळी नागरिकांनी देखील आपल्या काही सूचना असल्यास लेखी स्वरूपात पालकमंत्री कार्यालयात कळविण्याचे आवाहन मंत्री भुसे यांनी केले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here