Nashik News| राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा आज वाढदिवस होता. यानिमित्ताने जिल्ह्यात जागोजागी बॅनरबाजी करण्यात आली होती. दरम्यान,येवल्यातील एका वाढदिवसाच्या बॅनरवर काही अज्ञात व्यक्तींकडून शाईफेक करण्यात आली आहे. तसेच बॅनर फाडल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे.दरम्यान, छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात मराठा आरक्षणप्रश्नावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वीच मंत्री छगन भुजबळ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर आज छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर अज्ञात व्यक्तींकडून शाईफेक करण्यात आली.
Gas cylinder: काय सांगता…! आता 500 रुपयांना सिलेंडर मिळणार, अन् जुनी पेन्शन…
तसेच बॅनर फाडल्याचाही प्रकार घडला आहे. भुजबळांच्या येवला मतदारसंघातच ही घटना घडली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत चांगलीच चर्चा सुरू आहे. एकीकडे छगन भुजबळ यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले होते आणि आता दुसरीकडे त्यांच्याच येवला मतदार संघात भुजबळांच्या वाढदिवसाचा बॅनर फाडल्याची घटना घडली आहे. हा प्रकार नाशिक राज्य महामार्गाजवळ अंगणगाव येथे घडला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम