Eknath Shinde | बैठका सोडून शिंदे तडकाफडकी गावी; युतीच्या बैठका रद्द..?

0
43
#image_title

Eknath Shinde | विधानसभेचा निकाल लागून आठवडा उलटला असला तरी अद्यापही नव्या सरकारची स्थापना झाली नसून महायुतीच्या चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरूच आहे. अशातच आज मुंबईत महायुतीची बैठक आयोजित करण्यात आलेली बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

Eknath Shinde | ‘आमचं घोडं अडलेलं नाही, अडीच वर्षाच्या कारकिर्दीत मी समाधानी!’; अखेर शिंदेने दिला चर्चांना पूर्णविराम

एकनाथ शिंदे साताऱ्याला गावी गेल्यामुळे बैठक रद्द

अमित शहांचा फोन आल्यानंतर दोन दिवसानंतर ही बैठक पुन्हा होईल. असे सांगण्यात आले असून एकनाथ शिंदे साताऱ्याला आपल्या गावी गेल्यामुळे महायुतीची बैठक होणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काल दिनांक 28 नोव्हेंबर रोजी रात्री दिल्लीत अमित शहा यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री पदासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली असून या बैठकीत अमित शहा यांनी विविध सूचना दिल्या या बैठकीमध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार व देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

CM Eknath Shinde | ‘तुम्ही दादांना रेकॉर्डब्रेक लीड द्या, मी तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो’; मुख्यमंत्र्यांचा मालेगावकरांना शब्द

त्यानंतर, आज मुंबईमध्ये महायुतीची पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु अचानक पणे ही बैठक रद्द करण्यात आली असून महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नेमकी ही बैठक कोणत्या कारणामुळे रद्द करण्यात आली याबाबत कोणतेही ठोस कारण समजू शकलेले नाही.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here