Mahayuti Sarkar | महायुती सरकारकडून महिला आमदारांना खास भेट; मंत्रिमंडळात महिला आमदारांची संख्या वाढवणार!

0
27
#image_title

Mahayuti Sarkar | विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यांमध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला असून निवडणुकीत महायुती सरकारने घवघवीत यश मिळवले. तर विधानसभेत सर्वात जास्त जागा जिंकून देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार? की पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु या चर्चेमध्ये आता लाडक्या बहिणींना ओवाळणी देणारं महायुतीचं सरकार महिला आमदारांना सत्तेत काय वाटा देणार? या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान या नव्या सरकारमध्ये भाजपचा गड राखून ठेवलेल्या आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचे माहिती समोर आली आहे.

Mahayuti Sarkar | महाराष्ट्र सरकारची परदेशी कंपनीत उधारी?; नेमकं प्रकरण काय?

युतीसरकार मंत्रिमंडळ विस्तारात महिलांची संख्या वाढवणार? 

तर सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिपद देण्याच्या अनुषंगाने महिला आमदारांचे प्रोफाइल दिल्लीला पाठवण्यात आल्या असून भाजपकडून यंदा विधानसभेवर 14 महिला आमदार आहेत. तर राष्ट्रवादीच्या 4 व शिवसेनेच्या 2 आमदार विधानसभेतून निवडून आले आहेत. तर 14 निवडून आलेल्या आमदारांपैकी 4 महिला आमदारांचे मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आता वर्तवली जाऊ लागली आहे. तर या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिणी योजनेचा प्रभाव पाहायला मिळाला असून यामुळेच 4 महिला आमदारांची देखील मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आता वर्तवली जाऊ लागली आहे. त्यात या 4 आमदार कोण असणार याची चर्चा प्रामुख्याने होत असून मंत्रिमंडळात महिलांची संख्या वाढवण्यावर महायुती सरकार भर देत आहे. मुख्यमंत्रीपद ठरल्यानंतर मंत्रिमंडळातील खाते वाटप केले जाणार असून त्यामध्ये कोणत्या महिलांची वर्णी लागते. हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Mahayuti Sarkar | शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; निधी मिळत नसल्याने उचलले पाऊल

‘या’ महिला आमदारांच्या नावांची चर्चा

मागच्या मंत्रिमंडळ विस्तारात महिला व बाल विकास खाते सांभाळलेल्या आदिती तटकरे यांचे नाव यामध्ये प्रामुख्याने घेतले जात असून दुसरीकडे श्वेता महाले या देखील भाजपाच्या आमदार आहेत. त्यांच्याही नावाची चर्चा होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणखीन एक महिला आमदाराचे नाव चर्चेत असून शिवसेनेकडून एका महिला आमदाराचे नाव चर्चेत असल्याचे माहिती आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here