Nana Patole | झारखंडमध्ये मरदानाच्या शेवटच्या तासांमध्ये मते वाढली. पण ते प्रमाण फक्त दीड टक्काच होते. परंतु महाराष्ट्रात 7.6 टक्के मतदान वाढले. हे मतदान रात्री कसे वाढले? इतकी मोठी लाईन लागली कुठे होती? त्या लाईनचे फोटो निवडणूक आयोगाने द्यावे. अशी मागणी करत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोग बूथ कॅप्चरिंग करत आहे का? असा सवाल उपस्थित केला.
Nana Patole | ‘….तर राजकारण सोडलेले बरे!’; इव्हीएमच्या मुद्द्यावर नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
काय म्हणाले नाना पटोले?
नागपुरात आज पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी, “आपण निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले. आयोगाने त्यावर उत्तर देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. संध्याकाळी 6 नंतर 62.2% मतदान झाले होते. त्यानंतर रात्री 66.5% मतदान झाल्याचे सांगितले. 9 लाख मते कशी वाढली. याचे उत्तर आयोगाने द्यावे. निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय पारदर्शक कारभार करतात असे सांगितले जाते. मग ईव्हीएमचे एवढे प्रेम का?” असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. “या विरोधात आम्ही राज्यात स्वाक्षरी मोहीम राबवणार असून लोकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन मुख्य निवडणूक आयोगाला पत्र देणार आहोत. आम्ही न्यायालयात लढू, निवडणूक आयोगाला प्रश्न विचारू.” असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.
Nana Patole | ‘हि चर्चा केवळ मीडियातच’; राजीनाम्याच्या चर्चांना नाना पटोलेंनी दिला पुर्ण विराम!
महायुती सरकारवर साधला निशाणा
पुढे बोलत, “आम्ही मतदान वाढवल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. मात्र ते कसे वाढले? याचे स्पष्टीकरण ते देत नाहीत. हे सरकार लोकांच्या मतांनी नाही, निवडणूक आयोगाच्या कृपेमुळे आले आहे.” अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. “मुख्यमंत्री कोण होईल याचा निर्णय भाजपात घेईल. परंतु निकाल लागून पाच दिवस उलटले असले, तरी सरकार आले नाही. हे चिंताजनक आहे. एकनाथ शिंदे नाराज आहेत, का आणखीन कोण..याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही.” असे देखील म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम