नाशिक: अखिल भारतीय नाट्य परिषद आयोजित कै. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात पालकमंत्री दादाजी भुसे यांनी हजेरी लावली यावेळी विजेत्या संघांना भुसे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
Anukampa job: अनुकंपा भरतीत राज्यात नाशिकचाच डंका; उमेदवारांनी मानले मंत्री भुसेंचे आभार
यावेळी बोलतांना पालकमंत्री भुसे म्हणाले की एकांकिका ही समाजात परिवर्तन घडवण्याचे काम करते. प्रेक्षकांसाठी एक प्रकारे पर्वणी असून रिल्सच्या जमान्यात देखील प्रेक्षक टिकून राहिला हे कौतुकास्पद आहे. देशाच्या सिनेसृष्टीला अनेक कलावंत हे एकांकिका स्पर्धेने दिले आहेत. जनजागृती करण्याची एक वेगळी ताकद एकांकिका स्पर्धेत आहे. काळानुरूप अनेक बदल झाले असले तरी एकांकिका टिकून राहिली. या स्पर्धेतून अनेक कलावंत घडले आहेत भविष्यात देखील अनेक कलावंत उदयास येतील अशी भावना यावेळी पालकमंत्री भुसे यांनी व्यक्त केले.
कालिदास कलामंदिर नाशिक येथे गेल्या दोन दिवसापासून अखिल भारतीय नाट्य परिषद आयोजित कै. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा सुरू होती. आज समारोप प्रसंगी नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी रवींद्र कदम, सुनील ढगे, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, करुणा दहाळे, मोहन गीते, राजेंद्र जाधव तसेच सर्व नाट्यपरिषद शाखा नाशिकचे सर्व सदस्य, स्पर्धक, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम