Skip to content

योगेश आबा ऑन फिल्ड; शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या व्यथा


देवळा : देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती योगेश आहेर यांनी आज गुरुवारी दि २५ रोजी पदभार स्वीकारल्यानंतर थेट कांदा लिलावात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या .देवळा बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवडणूक मंगळवारी दि २३ रोजी पार पडली .माजी सभापती योगेश आहेर यांची सभापती पदी वर्णी लागली आहे .आज गुरुवारी सभापती आहेर यांनी मार्केटयार्डात जाऊन कांदा लिलावाला भेट दिली .

देवळा बाजार समितीत कांदा लिलावात भाग घेऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेताना नवनिर्वाचित सभापती योगेश आहेर समवेत शेतकरी व व्यापारी (छाया – सोमनाथ जगताप)

बाजार समिती मध्ये सद्या उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक असून, कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक करू नये ,शेतकऱ्यांना रोख पेमेंट मिळत असून, शेतकऱ्यांनी आपला माल इतरत्र न विकता देवळा बाजार समितीत विकावा असे आवाहन केले .दरम्यान , कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प भावामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, राज्य व केंद्र सरकारने याची दखल घेऊन भावात सुधारणा करावी , व मागील अनुदान लवकरात लवकर वर्ग करावे ,यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी आहेर यांनी सांगितले .

प्रत्यक्ष लिलावात सहभाग घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. व्यापाऱ्यांना काही अडचणी आहेत का याची विचारपूस करून शेतकऱ्यांचा मालाला प्रतवारीनुसार चांगल्या पद्धतीने भाव द्यावा , मार्केट संबंधी असलेल्या अडचणी लवकरात लवकर सोडवून देवळा बाजार समिती जिल्ह्यात नावारूपाला येण्याकामी आपण सर्व संचालक मंडळाला सोबत घेऊन प्रयत्न करणार असल्याचे शेवटी सभापती योगेश आहेर यांनी सांगितले.यावेळी शेतकरी ,व्यापारी व कर्मचारी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!