देवळा: अत्ताच्या युवा पिढीने मोबाईलमधील गेम खेळण्यापेक्षा मैदानावरील खेळ खेळा ,निश्चित ध्येय साध्य होईल असे प्रतिपादन नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर यांनी केले. येथे केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित तालुकास्तरीय खासदार चषक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
योगेश आबा ऑन फिल्ड; शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या व्यथा

यावेळी देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार, देवळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अशोक आहेर, गटनेते संभाजी आहेर, नगरसेवक मनोज आहेर, माजी उपनगराध्यक्ष व भाजप शहराध्यक्ष अतुल पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष योगेश उर्फ नानू आहेर, प्रवीण रौदळ, प्रवीण केदारे आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रिकेट, व्हॉलीबॉल, रस्सीखेच, कबड्डी या सामन्यांची उदघाटने करण्यात आली. तालुक्यातील मुले -मुलींच्या संघांची नोंदणी करून लगेचच सामने सुरू करण्यात आले. तीन दिवस हे सर्व सामने सुरू राहणार आहेत. यानंतर ३१ मे रोजी जिल्हास्तरीय खासदार चषकाचे अंतिम सामने नेमिनाथ जैन ब्रह्मचार्यश्रम चांदवड येथे होणार आहेत. यावेळी योगेश नानु आहेर यांच्यासह जनार्दन देवरे, पराग मोरे, राहुल आहिरे, मन्नू शेख, विकी सोनवणे यांच्यासह एकता फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते यांनी संयोजन केले. सुनील देवरे, नितीन गुंजाळ यांनी सुत्रसंचालन केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम