Skip to content

पोलिस अधीक्षक देवळा शहरात छापे टाकताय; देवळा पोलिस निरीक्षक कुठ ?


देवळा : लोहोणेर ता देवळा येथे आज गुरुवारी दि २५ रोजी सकाळी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या सह पथकाने अवैद्य गावठी दारू भट्टीवर छापा टाकून दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन व साहित्य नष्ट केले . स्वतः पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी गावठी हातभट्टी अड्ड्यावर छापा मारल्याने सर्रास उघड्यावर दारू विकणाऱ्या व बनविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत .

लोहोनेर ता देवळा येथे गावठी हातभट्टी दारू अड्डा उध्वस्त करतांना पोलीस अधीक्षक शहाजी उमाप समवेत सपोनि एम एस भामरे आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

वाजगावची कन्या संजना देवरे देवळा केंद्रात प्रथम

या कारवाईत देवळा पोलीस ठाण्यात दोन आरोपींवर राज्य दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळपास ८७ हजार ३६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दि २५ रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास लोहोणेर ता देवळा येथे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पथकासह अवैद्य गावठी दारू बनविण्यात येत असलेल्या हातभट्टीवर छापा टाकला. यावेळी आरोपी रामू महादू माळी रा लोहोणेर व गिरणा नदी किनारी असलेल्या सिद्धिविनायक किराणा दुकानात गावठी हात भट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारा 1485 किलो वजनाचा काळा गुळ विनापरवाना मिळून आल्याने दुकान मालक प्रदीप बच्छाव ह्या दोन आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एम एस भामरे ,पोलीस हवालदार मोरे, महिला पोलीस नाईक जाधव ,महिला पोलीस शिपाई रामप्यारी गणोरे , पोलीस नाईक वाघमारे, पोलीस शिपाई झाल्टे ,भुसाळ,वायकंडे ,चारोस्कर या पथकातील कर्मचाऱयांनी कारवाई केली .

ही सर्व कारवाई करत असताना देवळा पोलिस नेमके कुठ होते ? त्यांच्या आशीर्वादाने तालुक्यात अवैध धंदे वाढलेत का ? पुरोषात्तम शिरसाठ यांना जे जमले ते नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक आणि त्यांची यंत्रणा कुठल्या कामात गुंतली ? कमी कर्मचारी आहेत पोलिसांवर ताण जास्त आहे हे खरे असले तरी एवढ्याच कर्मचाऱ्यांवर शिरसाठ यांनी तालुक्यात दरारा निर्माण केला होता हे देखील विसरून चालणार नाही. पोलिस निरीक्षक आपल्या कामगिरीची छाप कधी उमटवणार याकडे तालुका वासीयांचे लक्ष आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!