Skip to content

Anukampa job: अनुकंपा भरतीत राज्यात नाशिकचाच डंका; उमेदवारांनी मानले मंत्री भुसेंचे आभार


Anukampa job: राज्यात वर्षानुवर्ष रेंगाळत असलेला प्रश्न म्हणजे अनुकंपा भरती. सरकार आले गेले मात्र अनुकंपा धारकांना दिलासा काही मिळाला नाही. घोषणांचा पाऊस पडला तरी देखील पात्र उमेदवारांना नोकरी मिळाली नाही. अनेक कुटुंबांचे हाल झाले. नोकरी साठी चकरा मारण्यात काहींचे वय संपले मात्र निर्णय काही झाला नाही. राज्यात नुकतेच शिवसेना – भाजपा सरकारने निर्णय घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुकंपा धारक पात्र उमेदवारांना सेवेत घेण्याची घोषणा करत अतिशय अल्पपवेळेत उमेदवारांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.  यात राज्यात सर्वाधिक वेगवान निर्णय घेण्यात नाशिक जिल्हा असल्याने राज्यभरात मंत्री दादाजी भुसे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Anukampa job)

जागतिक मराठा क्रांती घडावणारा वाघ हरपला….!

अनुकंपा भरतीत कुटुंबातील कुणी व्यक्ती अपघाती निधन पावल्यास त्याच्या जागी कुटुंबातील सदस्याला सेवेत घेतले जाते. मात्र या प्रक्रिया वर्षानुवर्ष रखडल्याने याचा फटका मोठ्या प्रमाणात अनेक कुटुंबीयांना बसला आहे. मात्र या कुटुंबीयांना न्याय देण्याचे काम शिंदे – फडणवीस सरकारने केले. कित्येक कुटुंबियात अनेक वर्षानी दिवाळी साजरी झाली. कुटुंबातीलच कुणाच्या तरी निधनाने त्यांना पद मिळत असल्याचे दुख असले तरी सरकारने न्याय दिल्याची भावना यावेळी उमेदवारांनी बोलून दाखवली. शासन निर्णय दि 22/12/2021 नुसार अनुकंपा तत्वावर 20 टक्के पदे भरण्याच्या मर्यादेस दि. 31. 12. 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शासन निर्णय दि 26/08/2021 नुसार अनुकंपा तत्वावर नियुक्तत्या जलदगतीने होण्यास सहाय्यभूत म्हणून अनुकंपा नियुक्ततीची प्रमाणित कार्यपध्दती (SOP) प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार शासनाने कारवाई सुरू करत पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. (Anukampa job)

राज्यात नाशिक अव्वल

अनुकंपा भरतीत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पाठपुरावा करत बैठका घेतल्याने जिल्ह्यातील जवळपास ४४९ पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. तर उर्वरित पात्र उमेदवारांना देखील लवकर सेवेत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे राज्यात सर्वाधिक कामाचा वेग हा नाशिक जिल्ह्याचा असल्याने राज्यभरात नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Anukampa job)

अनुकंपा म्हणुन कुणाला घेण्यात येते ?

शासकीय सेवेत असताना अधिकारी/कर्मचारी दिवंगत झाल्यास अथवा गंभीर आजार, अपघात यामुळे शासकीय सेवा करण्यास वैद्यकीय दृष्ट्टया कायमचा असमर्थ ठरल्यामुळे रुग्णता सेवा निवृत्त झाल्यास त्याच्या कुटुंबावर ओढावण्या-या आर्थिक आपत्तीत कुटुंबिंयांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने अनुकंपा(Compassion)नियुक्तीची योजना लागू  केली. यात कुटुंबातील पात्र व्यक्तीला संधि देत न्याय दिला जातो.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!