Skip to content

जागतिक मराठा क्रांती घडावणारा वाघ हरपला….!


द पॉइंट नाऊ: वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन (WMO) चे संस्थापक अध्यक्ष प्रवीण पिसाळ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले आहे. मराठ्यांना सोशल मीडिया वर एकत्र आणून जागतिक मराठा क्रांती घडावणारा समाजातील एक सचा वाघ हरपल्याची सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे. समाज आज खऱ्या अर्थाने पोरका झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन (WMO) चे संस्थापक अध्यक्ष प्रवीण पिसाळ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने सकाळी निधन झाले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. काही वर्षांपासून देशभरातील मराठा समाजाला एकत्र आणून सामाजिक कार्य यामाध्यमातून केलं जातं होते. अनेक गोर गरीब मराठा समाजाला या संघटनेच्या माध्यमातून मदत करण्यात येत होती

सोशल मीडियावर ही बातमी काही क्षणात व्हायरल झाली असून यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या लढवय्या मराठ्याला विनम्र अभिवादन.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Tags:
Don`t copy text!