ED Raid : हिरो मोटोकॉर्पच्या चेअरमन पवन मुंजाल ईडीच्या रडारवर

0
16

ED Raid : सुप्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या हिरो मोटो कॉर्प कंपनीचे चेअरमन पवन मुंजाल यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालया तर्फे छापेमारी करण्यात आली आहे.ED Raid

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अंमलबजावणी संचालनालयातर्फे छापेमारी सत्र सुरू आहे. यामध्ये अनेक राजकीय पदाधिकारी व त्यांचे निकटवर्तीय यांच्या घरांवर देखील छापेमारी करण्यात आली. ED Raidयातच आता सुप्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्प या कंपनीचे चेअरमन असलेल्या पवन मुंजाल हे ईडीच्या रडारवर आले आहेत. पवन मुंजाल यांच्या घरी ईडी पथकाने छापा टाकला असून मनी लॉन्ड्री च्या संशयावरन त्यांच्या घरी हा छापा टाकण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.ED Raid

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या तक्रारी वरून मनी लॉन्ड्रींग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार दिल्ली आणि गुरुग्राम मधील मुंजा यांच्या घरांवर हे छापे टाकण्यात आले.ED Raid या प्रकरणाचा तपास या तक्रारीमुळे सुरू आहे.

पवन मुंजाल यांच्या निकटवर्ती आणि विरोधात कथेत तक्रार करण्यात आली आहे. अघोषित परकीय चलन बाळगल्या प्रकरणी काही दिवसांपूर्वी संबंधित व्यक्तीची चौकशी करण्यात आली होती.ED Raid दिल्ली आणि गुरुग्राम येथील परिसरामध्ये ही छापेमारी करण्यात येत असून या छापेमारी सत्रानंतर याचा मोठा प्रभाव शहर मार्केट वर देखील बघायला मिळाला.

https://thepointnow.in/pm-sanman-yojna/

ईडीच्या छापेमारीनंतर हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या स्टॉकमध्ये मोठी घट झाली आहे. या छापेमारी नंतर हीरो मोटोकॉर्पच्या स्टॉकमध्ये घसरण दिसून आली असून मंगळवारी दुपारच्या सुमारास कंपनीचे शेअर ४.२६ टक्क्यांनी किंवा १३६.४५ रुपयांवरून घसरून ३०६७.१० रुपयांवर ट्रेड कोसळला होता.shares

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने कथित कॉर्पोरेट गव्हर्नन्स समस्यां बद्दल हीरो hero मोटोकॉर्पविरुद्ध चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे ईडीने जून june महिन्यामध्ये एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते. हीरो मोटोकॉर्पवर कथितरित्या शेल कंपन्या चालवल्याचा आरोप करण्यात आला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here