Political.Crisis : अजित दादा हे वागणं बरं नव्ह ; ज्यांनी दिले राजकारणाचे धडे त्यांना अजितदादा का टाळताय बरे?


Political.Crisis : शरद पवार हे अजित पवारांचे सख्खे काका आहेत. राजकारणाचे धडे त्यांनी शरद पवार यांच्याकडूनच घेतले आहेत. भाजप सोबत जाऊन अजित पवार यांनी वेगळी वाट निवडली आहे. मात्र, शरद पवार यांचे विरोधक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी हे शरद पवार यांना नमस्कार, हस्तांदोलन करत असताना दुसरीकडे त्यांचे सख्खे पुतणे अजित पवार यांनी काकांना टाळल्याचे दिसून आले.Political.Crisis

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने ते पुणे दौऱ्यावर होते. काही दिवसंपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनंतर या सोहळ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. कारण, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच व्यासपीठावर येणार होते.

मात्र, आजच्या या सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.Political.Crisis

शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी सत्ताधारी भाजपशी हातमिळवणी केली. या सर्व घडामोडींनंतर शरद पवार आणि अजित पवार हे प्रथमच एका व्यासपीठावर आले.Political.Crisis

https://thepointnow.in/ed-raid/

विशेष म्हणजे, अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी हस्तांदोलन केले नाही, त्यांना नमस्कारही केला नाही. अजित पवार यांनी शरद पवार यांना व्यासपीठावर दोन वेळा टाळल्याचा हा व्हिडिओ आहे. विशेष म्हणजे, शरद पवार यांनी त्यांच्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार असा उल्लेख केला.

बंडखोरी केल्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांची एकूण तीनवेळा भेट घेतली होती. पहिल्यांदा ते त्यांच्या काकू प्रतिभा पवार यांच्या प्रकृतिची विचारपूस करण्यासाठी गेले होते. प्रतिभा पवार यांच्या हातावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानिमित्त ते सिल्व्हर ओक या निवासस्थानी तब्ब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. Political.Crisisत्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वात त्यांचे समर्थक पदाधिकारी व मंत्री यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांना भेटले. तर, विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्या नेतृत्वात सर्व आमदार हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!