PM sanman yojana : केंद्र सरकारचे पैसे आले पण राज्य सरकार कडून फक्त अश्वासानंच मिळाले ; राज्यात किसान सन्मान की शेतकऱ्याचा अवमान?


PM sanman yojna : केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येत असलेला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शिरपूर मधील शेतकऱ्यांच्या अकाउंट केंद्र सरकारकडून देण्यात येत असलेले दोन हजार रुपये जमा झाले मात्र, राज्य शासनाने कबूल केलेले दोन हजार रुपये जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना लागू केली. या योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी १२ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टप्या- टप्याने जमा केले जात होते. याच धर्तीवर राज्य शासनानेही १२ हजार रुपयांची वाढ करून २४ हजार आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची घोषणा केली.Kisan sanman nidhi मात्र नंतर राज्य सरकारने यात बदल केला आणि ही योजना उशीराने अंमलात येणार असल्याचे सांगितले. यामुळे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांची वारंवार चेष्टा केली जात आहे का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

https://thepointnow.in/there-is-no-action-against-that-fertilizer-seller/
केंद्र शासनाकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना लागू केली आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपये जमा होवू लागले आहेत.PM sanman yojna वर्षाला सहा हप्यात १२ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर मागील तिन वर्षापासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. Pm sanman yojana

राज्यातील सरकार बदलल्या नंतर शिंदे सरकारने शेतकऱ्यांनाही राज्य सरकार केंद्र सरकारप्रमाणे मदत करेल अशी घोषणा केली आणि ही मदत या १४ व्या हप्यापासून दिली जाणार असल्याचे जाहीर केले. शेतकरी एकीकडे खुश झाला होता. कारण आता २ हजाराऐवजी ४ हजार रुपये मिळणार या आनंदात शेतकरी वर्ग होता आणि हा हप्ता कधी जमा होईल याची वाट प्रत्येक शेतकरी लाभार्थी पाहत होता.

Kisan sanman nidhi २८ जुलै २०२३ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारचे २ हजार रुपये जमा झाले. मात्र या सोबत राज्य सरकारचे २ हजार रुपये जमा न झाल्यामुळे या सरकारच्या निर्णयामुळे तिव्र नाराजी व्यक्त करत आहेत. एकीकडे शेतकरी संकटात आहे. राज्यातील काही भागात पाऊस अधिकचा झाला तर काही भागात अल्प झाला. ज्या भागात अल्प पाऊस झाला तेथे दुबार पेरणीच्या संकटात शेतकरी अडकला आहे तर जेथे अधिकचा पाऊस झाला तेथे ओल्या दुष्काळाने शेतकरी अडचणीत आला आहे.Kisan sanman nidhi

यामुळे केंद्र आणि राज्य शासनाची ही योजना शेतकऱ्यांना तारणार असल्याचे अनेक शेतकरी बोलून दाखवत होते. मात्र राज्य शासनाने यामध्ये यु टर्न घेत ही योजना सध्या लागू झाली नाही. मंत्री मंडळाचा निर्णय झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातील अशी भुमिका घेतली होती. यामुळे शेतकरी वर्गात राज्य शासनाच्या विरोधात सध्या चिड निर्माण झाली आहे

धुळे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाऊस नसल्याने अनेकांच्या शेतीतील पिकांची वाढ खुढली आहे , कापसावर लाल्या रोगाच्या अतिक्रम , मक्यावर लष्करी गाडीचे प्रादुर्भाव . दुबार पेरणी संकट वाढवलेला आहे यातच शासनाकडून कोणतीही मदत किंवा घोषणाही अद्याप झालेली नाही. अजून प्रशासनाकडून पंचनामेही केले जात नाहीत. केवळ राजकीय नेते मंडळी बांधावर येवून फोटो काढून निघून जात आहेत. मदत कधी देणार अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

एकीकडे शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अगोदरच सरकारच्या धोरणा विरोधात तिव्र नाराजी व्यक्त करत आहे आणि अशातच शेतकऱ्यांनी कोणतीही मागणी न करता राज्य सरकारने दोन हजार रुपयांची घोषणा केली. ही घोषणा हवेतच विरगळली काय? केवळ शेतकऱ्यांच्या बाबतीत हेPM sanman yojna सरकार घोषणा करत आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे अशी वल्गना करत असून खऱ्यज्ञा अर्थाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार राज्य सरकार करत असल्याची तिव्र भावना शेतकऱ्यांतून आता उमटत आहे. यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांची चेष्टाच केली आहे.

किरण भलकार – ग्रामपंचायत सदस्य – त-हाडी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!