Skip to content

देवळा शहरात रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान


देवळा : येथे सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या संकल्पनेतून देवळा पोलीस ठाणे व एस के डी इंटरनॅशनल स्कुल भावडे देवळा यांचे संयुक्त विद्यमाने मंगळवार दि १ रोजी देवळा शहरात ‘रस्ता सुरक्षा ‘जनजागृती अभियान राबविण्यात आले.

देवळा / शहरात राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियानात उपस्थित सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील आदींसह एसकेंडीचे विद्यार्थी आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

सदर अभियानात सहा. पोलीस निरीक्षक दिपक पाटील पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे , पोलिस नाईक ज्योती गोसावी, राहुल शिरसाठ, पोलीस शिपाई . गणेश वराडे, जामदार, शरीफ शेख आदींसह एस के डी इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य सुनिल पाटील,स्काऊट गाईड विभाग प्रमुख अजय बच्छाव शिक्षक- राहुल पाटील , रोहित मालवे आदी उपस्थित होते . या रस्ता सुरक्षा अभियानात विध्यार्थ्यानी संपूर्ण देवळा शहरात रॅली काढून रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविले . सदर अभियानात विद्यार्थ्यांनी रस्ता अपघात संदर्भात वेगवेगळी प्रात्यक्षिके करून दाखविले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी सर्व वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे , अपघात घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे सांगितले .

ग्रामीण भागात देखील वाहन धारकांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे . बहुतांश वाहनधारक हेल्मेट ,सीट बेल्टचा वापर करत नाहीत . हा कायद्याने गुन्हा आहे . यामुळे अपघातात मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण वाढले असून , प्रत्येक वाहनधारकाने काळजी घेणे गरजेचे आहे . यापुढे शहरात कडक अमंलबजावणी करण्यात येणार असून ,नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांवर कडक व दंडात्मक कारवाई करण्यात येईल .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!