Deola | पाटचारीच्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान; नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

0
58
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | डोन शिवार धरणात पाटबंधारे विभागाने पाट चारीला अतिरीक्त पाणी सोडल्यामुळे चारीचे पाणी थेट शेतात शिरल्याने याठिकाणच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, पाटाचे पाणी कमी करण्यात यावे, तसेच झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी डाळिंब उत्पादन शेतकरी अतुल आहेर यांच्यासह बहुतांश शेतकऱ्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Deola | कोलती नदी पाणलोट क्षेत्रात वाहून गेलेल्या दुचाकीस्वाराचा मृतदेह तब्बल पाच दिवसांनी सापडला

पाटबंधारे विभागाकडे प्रसिद्धी पत्रक दिले

पत्रकाचा आशय असा की, चणकापूर उजवा कालवा उपविभाग अंतर्गत देवळा येथील मटाणे रोड येथून सटवाईचीवाडी परीसरातून गेलेल्या पाट चारी क्र. ३ ला जास्त प्रमाणात पाणी सोडल्यामुळे लगतच्या शेतातील मका, चाळीतील कांद्याचे, कांदा तसेच डाळींब पिकाचे नुकसान झाल्याने चारीचे पाणी बंद करण्यात यावे, अशी मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती. मात्र याची दखल न घेता उलट पाटाला जास्त प्रमाणात पाणी सोडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीट चोळण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे आधीच अतिरीक्त झालेल्या पावसामुळे पिकाचे नुकसान झालेले असून त्यात अतिरिक्त पाटाच्या पाण्यामुळे पाटा लगतच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.

Deola | भर पावसात पुल ओलांडणे पडले महागात; कोलती नदी पाणलोट क्षेत्रात दुचाकीस्वार वाहून गेल्याची घटना उघडकीस

नुकसान भरपाई न मिळाल्यास कोर्टात जाणार

नुकसान झालेल्या पिकांची प्रत्यक्ष जागेवर पहाणी करून पंचनामे करण्यात यावेत. अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा नुकसानीस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्या विरुद्ध कोर्टात दावा दाखल करून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येईल असा इशारा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. पत्रकावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here